🛑 जामखेडला तीन क्वारंटाईन सेंटर 🛑
( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा )
जामखेड -⭕जिल्ह्यात सर्वाधिक करोना रुग्ण जामखेड शहरात सापडले होते. त्यावेळी जामखेडकरांनी एक पॅटर्न राबवून शहर करोना मुक्त केले. हा पॅटर्न राज्यात गाजला. पण आता पुणे, मुंबई येथून मोठ्या प्रमाणावर चाकरमाने गावी परतत आहेत. या सर्वांना तीनच ठिकाणी विलगीकरण कक्षात ठेवून प्रशासन व सामाजिक संस्थांमार्फत त्यांच्या चहा, नाश्ता व दोन वेळच्या जेवणाची सोय करण्यात येणार आहे, असे आमदार रोहित पवार यांनी सांगितले.
शहरातील दोन्ही विलगीकरण कक्षांची पाहणी करून आ. पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात ते बोलत होते. यावेळी मधुकर राळेभात, तहसीलदार विशाल नाईकवाडे, पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील, सावळेश्वर उद्योग समूहाचे रमेश आजबे, सूर्यकांत मोरे, प्राचार्य नवनाथ बोडखे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
करोनामुक्त जामखेडसाठी प्रशासनाने रात्रंदिवस कष्ट घेतले. पण आता मोठ्या प्रमाणावर बाहेरून लोक आपापल्या गावी परतत आहेत. त्यांना दहा दिवस प्रशासनाने तालुक्यातील 80 ठिकाणी विलगीकरण कक्ष स्थापन करून ठेवले होते.
पण ग्रामीण भागात अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. अनेक तक्रारी आल्यानंतर आता बाहेरून येणारे लोक तालुक्यातील तीनच ठिकाणी क्वारंटाईन करण्यात येणार आहेत. ल. ना. होशिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात जामखेड, धोत्री, बटेवाडी, चुंबळी, जमादारवाडी, मोहा, भुतवडा, लेनेवाडी, जामवाडी, साकत, कोल्हेवाडी, पिंपळवाडी, शिरूर, सावरगाव, पाडळी, खुरदैठण, कुसडगाव, सरदवाडी, रत्नापूर, सारोळा, काटेवाडीतील लोकांना क्वारंटाईन करण्यात येणार आहे.
नागेश माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आरणगाव, पारेवाडी, डोणगाव, पिंपरखेड, हसनाबाद, कवडगाव, गिरवली, पाटोदा, खामगाव, भवरवाडी, सांगवी, खांडवी, बावी, डिसलेवाडी, धोंडपारगाव, राजेवाडी, फक्राबाद, धानोरा, वंजारवाडी, हळगाव, चौंडी, आघी, मतेवाडी, नान्नज, घोडेगाव, चोभेवाडी, पोतेवाडी, बोर्ले, मुंजेवाडी, जवळा, महारुळी, वाघा, गुरेवाडी, राजुरी, डोळेवाडी येथे आलेल्या व्यक्तींना क्वारंटाईन करण्यात येणार आहे. खर्डा येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये खर्डा, मोहरी, नागोबाची वाडी, मुंगेवाडी, दिघोळ, माळेवाडी, जातेगाव, तरडगाव, वंजारवाडी, सातेफळ, दौंडाची वाडी, सोनेगाव, धनेगाव, जवळके, नायगाव, नाहुली, देवदैठण, धामणगाव, पिंपळगाव (आळवा), आपटी, बांधखडक, पांढरेवाडी, दरडवाडी, लोणी, आनंदवाडी, वाकी, बाळगव्हाण, तेलंगशी, जायभायवाडी, पिंपळगाव (उंडा) येथे येणाऱ्या व्यक्तींना क्वारंटाईन करण्यात येणार आहे.