
*समाधानकारक” आज जिल्ह्यात आज पुन्हा 4 जणांना सुट्टी, आतापर्यंत 59 रुग्ण बरे होऊन घरी*
*नांदेड, दि २४ ; राजेश एन भांगे*
रविवार दिनांक 24 मे 2020 रोजी प्राप्त झालेल्या अहवालानुसार आज दिवसभरात एकही, रुग्ण पॉझिटिव्ह आढळला नाही तर 4 जणांना सुट्टी देण्यातआली आहे, सध्या नांदेडचा एकूण पॉसिटीव्ह रुग्णांचा आकडा 125 वरच थांबला असून, त्या पैकी
आता पर्यंत एकूण बरे होऊन घरी गेलेल्यांची रुग्णांची संख्या 59 वर पोहचली आहे. तर 6 रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे, व 2 कोरोना पॉसिटीव्ह रुग्ण अद्यापही फरार आहेत, सध्या 60 पॉसिटीव्ह रुग्णांनावर जिल्ह्यातील विविध कोविड केअर सेंटर येथे उपचार सुरु आहेत, तर आज 172 लोकांचे स्वाब नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आलेले आहेत त्यांचे अहवाल उद्या संध्याकाळपर्यंत प्राप्त होतील असे आरोग्य विभागाकडून कळविण्यात आले आहे.
• आत्तापर्यंत एकूण संशयित – 3149
• एकूण क्वारंटाईन व्यक्तींची संख्या-2828
• क्वारंटाईन कालावधी पूर्ण – 1482
• अजून निरीक्षणाखाली असलेले – 256
• पैकी दवाखान्यात क्वारंटाईनमध्ये – 71
• घरीच क्वारंटाईनमध्ये असलेले -2757
• आज घेतलेले नमुने – 172
• एकुण नमुने तपासणी- 3254
• एकुण पॉझिटीव्ह रुग्ण- 125
• पैकी निगेटीव्ह – 2746
• नमुने तपासणी अहवाल बाकी- 243
• नाकारण्यात आलेले नमुने – 14
• अनिर्णित अहवाल – 122
• कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतलेले – 59
• कोरोना बाधित रुग्णांची मृत्यू संख्या – 6
• जिल्ह्यात बाहेरून आलेले एकूण प्रवासी 132091 राहण्याचा सल्ला दिलेला आहे. तसेच त्यांच्या हातावर शिक्केही मारण्यात आले आहेत.
दरम्यान नागरिकांनी सुरक्षित राहावे. अत्यावश्यक कामाशिवाय घरा बाहेर पडू नये असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.
सदर माहिती दि.२४ रोजी सायं ५ वा. प्राप्त.