• Home
  • जेजुरीच्या खंडोबाच्या दर्शनासाठी येणाऱ्या नवविवाहित जोडप्यावर कारवाई होणार.!

जेजुरीच्या खंडोबाच्या दर्शनासाठी येणाऱ्या नवविवाहित जोडप्यावर कारवाई होणार.!

*⭕पुणे – जेजुरीच्या खंडोबाच्या दर्शनासाठी येणाऱ्या नवविवाहित जोडप्यावर कारवाई होणार.!*
पुणे 🙁 विजय पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज)

साऱ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या श्री क्षेत्र जेजुरी येथील खंडोबा मंदिर करोना प्रादुर्भावामुळे गेल्या दोन महिन्यांपासून बंद असल्याने गड व परिसरात ग्रामस्थ व भाविकांना जाण्यास सक्त मनाई आहे. असे असले तरी सध्या राज्याच्या विविध भागातून काही भाविक व नवविवाहित जोडपी खाजगी वाहनाने जेजुरीत येत असल्याचे निदर्शनास आले आहे.अशा भाविकांची गाडी जप्त करून त्यांचेवर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याची माहिती जेजुरीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अंकुश माने यांनी दिली.

anews Banner

Leave A Comment