Home Breaking News दीड महिन्यांच्या बाळाचा वाचवण्यासाठी डॉक्टरनं स्वत:चा जीव घातला धोक्यात !

दीड महिन्यांच्या बाळाचा वाचवण्यासाठी डॉक्टरनं स्वत:चा जीव घातला धोक्यात !

209

⭕ दीड महिन्यांच्या बाळाचा वाचवण्यासाठी डॉक्टरनं स्वत:चा जीव घातला धोक्यात ! ⭕
मुंबई : ( विजय पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई : देभरात कोरोनाचं थैमान सुरू आहे. दीड महिन्यांच्या चिमुकल्यापासून ते 93 वर्षांच्या आजोबांपर्यंत वयोगाटातील रुग्णांची कोरोनाशी झुंज सुरू आहे. सोशल मीडियावर सध्या एका दीड महिन्यांच्या चिमुकल्याचा फोटो तुफान व्हायरल होत आहे. हा चिमुकला कोरोना पॉझिटिव्ह असून त्याच्या फुफ्फुसांना सूज आली होती. त्याची प्रकृती रात्री उशिरा खालवल्यामुळे डॉक्टरांना अचानक शस्त्रक्रिया करावी लागली.

सायन रुग्णालयात दीड महिन्यांच्या चिमुकल्याची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली. त्यानंतर त्याच्यावर उपचार सुरू होते. या उपचारादरम्यान रात्री उशिरा अचानक प्रकृती खालावली. या चिमुकल्याच्या फुफ्फुसाला सूज आल्यानं श्वास घेण्यासाठी त्रास होऊ लागला. मेंदूमध्ये रक्तस्त्रव झाला. डॉक्टरांच्या टीमनं या चिमुकल्यावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी भूल देण्याची व्यवस्था केली.

अवघा अडीच किलो वजनाचं हे बाळ मृत्यूसोबत झुंज देत होतं. डॉक्टरांना ही घालमेल पाहावेना.भूल देताना चिमुकल्याला कोरोनाचं संक्रमण टाळण्यासाठी लावण्यात आलेल्या मास्क आणि शिल्डमुळे बाळाच्या तोंडातली नळी आत सरकवता येत नाहीय. ही बाब लक्षात येताचं त्यानी रिस्क घेऊन आपला मास्क, संरक्षक चष्मा काढून टाकला आणि बाळाच्या जवळ जाऊन ही नळी बाळाच्या तोंडात सरकवली..

आपल्याला संरक्षण कवच काढल्यानंतर कोरोनाचा संसर्ग होणार हे माहीत असतानाही केवळ चिमुकल्याचा जीव वाचवण्यासाठी या डॉक्टरांनी मोठी रिस्क घेऊन शस्त्रक्रिया पूर्ण केली आहे. ऑपरेशननंतर भूलतज्ज्ञांनी स्वत:ला 14 दिवसांसाठी क्वारंटाइन केल्याची माहिती समोर आली.

Previous articleकोरोनाचे संकट ! मुंबईतून येणाऱ्यांसाठी अशी केली जातेय व्‍यवस्‍था !
Next articleग्रामीण रूग्णालयाचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी निवेदन.*
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.