• Home
  • ग्रामीण रूग्णालयाचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी निवेदन.*

ग्रामीण रूग्णालयाचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी निवेदन.*

*ग्रामीण रूग्णालयाचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी निवेदन.*
*कोल्हापूर(मोहन शिंदे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज)*
कोल्हापुर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यात किणी गांव मुंबई बेंगलोर हायवेलगत असलेल्या गावामध्ये बरेच दिवसापासून ग्रामीण रूग्णालयाची मागणी होती.
सदर रूग्णालयाचा फायदा जवळपासच्या गावातील नागरिकांना होणार आहे.
तालुक्याचे विद्यमान आमदार राजूबाबा आवळे यांनी महाराष्ट्राचे आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावरकर यांच्याकडे प्रलंबित ग्रामीण रूग्णालयाचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी निवेदन देण्यात आले.
मा.मंत्री महोदयांनी लवकरच ग्रामीण रूग्णालयाचा प्रश्न मार्गील लावण्याचे आश्वासन दिले.
तसेच या ग्रामीण रूग्णालयाचा आसपासच्या खेड्यातील गोरगरिबांना लाभ घेता येईल, आणि हायवेवरती सतत अपघात होत असतात. अपघातील जखमींवर लवकरात लवकर उपचार करता येईल असे उदगार मंत्रीमहोदय यांनी व्यक्त केले.

anews Banner

Leave A Comment