*झोडगेच्या कोरोना तपासणी केंद्राला अधिकाऱ्यांनी दिली पाहणी भेट*
मालेगांव,(सतिश घेवरे प्रतिनिधी शेंदुर्णी मालेगांव युवा मराठा न्युज)- नाशिक जिल्ह्यातील मालेगांव तालुक्यात असलेल्या झोडगे येथील कै.संदीप कला महाविद्यालयात झोडगे परिसरातील ग्रामीण जनतेसाठी सुरु करण्यात आलेल्या कोरोना आजार ताप तपासणी,कोविड १९सेंटर तपासणी केंद्राला आज मालेगांवचे उपविभागीय अधिकारी विजयानंद शर्मा,तहसीलदार चंद्रसेन राजपुत,गटविकास अधिकारी देवरे,श्रीमती डाँ.केदारे मँडम,श्री.शंखपाळ साहेब आदीनी भेट देऊन संबंधितांना मार्गदर्शनपर सुचना केल्यात.यावेळी ग्रामपंचायत झोडगेचे कर्मचारी अरुण काळगुडे,भुषण देसले उपस्थित होते.