• Home
  • ” मी शपथ घेतो की ” उध्दव ठाकरेंनी घेतली आमदारकीची शपथ

” मी शपथ घेतो की ” उध्दव ठाकरेंनी घेतली आमदारकीची शपथ

⭕ ” मी शपथ घेतो की ”
उध्दव ठाकरेंनी घेतली आमदारकीची शपथ ⭕

मुंबई : ( विजय पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमदारकीची शपथ घेतली आहे. विधीमंडळात हा शपथविधी पार पडला. उद्धव ठाकरे यांच्यासोबत बिनविरोध निवडून आलेल्या इतर आठ उमेदवारांनाही आमदारकीची शपथ घेतली. राज्यावर करोनाचं संकट असल्याने नेहमीप्रमाणे भव्य कार्यक्रम न घेता विधीमंडळात साधेपणाने हा शपथविधी पार पडला. शपथविधीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात यांच्यासह अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीवरुन राज्य सरकारसमोर मोठा पेच उभा राहिला होता. पण उद्धव ठाकरे यांची विधानपरिषदेवर बिनविरोध निवड झाल्याने महाविकास आघाडीने सुटकेचा निश्वास सोडला होता.

anews Banner

Leave A Comment