⭕ पुणे शहरातील गिरीजा कट्टा (हॉटेल गिरीजा, टिळक रस्ता) येथे गेल्या ५२ दिवसांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या सेवापर्वाची सांगता आज झाली ⭕
पुणे : ( विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )
श्री. उदयजी जोशी आणि श्री. चंद्रकांत (भाऊ) सणस यांच्या अथक परिश्रमातून आणि नियोजनातून, तसेच असंख्य मदतीच्या हातांनी गेली ५२ दिवस १ लाख ०२ हजार पेक्षा जास्त जेवणाच्या डब्ब्यांची सोय करण्यात आली. पुणे महापालिकेच्या निवारा केंद्रात आणि गरजूंना दोन्ही वेळचे जेवण पुरविले जात होते.
कोरोनाच्या संकटाच्या काळात या कम्युनिटी किचनच्या माध्यमातून झालेली ही मदत अतुलनीय अशीच म्हणावी लागेल. आज माझ्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत शेवटचे डबे वितरीत करण्यात आले. खरं तर हा शेवट नाही, तर एका टप्प्याची समाप्ती म्हणावी लागेल. या सेवापर्वाला पुणेकरांकडून सलाम !
समारोपावेळी उपमहापौर सौ. सरस्वतीताई शेडगे, स्थायीचे अध्यक्ष श्री. हेमंतजी रासणे, राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष श्री. विद्याधरजी अनासकर, महाराष्ट्र टाईम्सचे संपादक श्री. परागजी करंदीकर, प्रांताधिकारी श्री. संदेशजी शिर्के, दत्तवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक श्री. देविदास गेवारे यांच्यासह पत्रकार बांधव आणि कट्ट्याचे सदस्य उपस्थित होते.