Home Breaking News *मुले ही देवाघरची फुले असतात हे आपण नेहमी बोलत असतो*

*मुले ही देवाघरची फुले असतात हे आपण नेहमी बोलत असतो*

273
0

मुले ही देवाघरची फुले असतात हे आपण नेहमी बोलत असतो आणी ते अगदी खरे आहे. आज सहज विचार करीत बसलो होतो आणी सहज लक्षात आले की हे चिमुकले आपण विसरलो ते ही कौतुकास पात्र आहेत,आपण रोज फेसबुक, वर्तमान पत्रे व अनेक माध्यमातून कोरोनो या भयंकर रोगावर वाचत असतो तसेच त्या विरुध्द जिवाची पर्वा न करणारे व लढणारे, झटणारे डॉक्टर , पोलिस , नर्स, होम गार्ड, विविध समाज सेवक या बाबत वाचुन आपण कौतुक करीत असतो ते महान लोक त्यास खरच पात्र आहेत,त्यांचे आभार मानावे तेवढे कमी आहेत, आज देवदूत म्हणून धावले आहेत ते आपल्यासाठी सहज विचार आला की कुणितरी या स्थितीत या संकटात आपल्याला मदत कर णारी लहान मुले यांच पन कौतुक करावे तितके कमी असे वाटले व थोडे त्यांचे कौतुकाचे 2 शब्द लिहावे असे मला वाटले, मित्रानो बघा आपल्याला आपलया घरी शेजारी पाजारी, सभोवताली एक गोष्ट पाहण्यास मिळते आहे, कोरोनाने 3 महिन्या पासुन जगभर हाहाकार माजवला आहे अश्या परिस्थीतीच भान ठेवून ही चिमुकली घरात बसुन आहेत, खेळणे बागडने बंद आहे, आई बाबा बरोबर बाहेर जाने बंद आहे, त्याना काही कळत ही नाही अजुन तरी कुठलाही हट्ट न करता, काही न मागता, शान्त बसुन आहेत कुठून आली असेल मग त्यांच्यात ही समय सुचकता, मग एक गोष्ट खरी ठरते खरच ही निष्पाप मुले देवा घरची फुले असतात, आजच्या परिस्थीतीच भान ठेवून मुले जे वागत आहेत नक्कीच ते कौतुकास पात्र आहेत, बघा येरवी मुले आपल्या हट्टा पोटी आई बाबाना नाकी नवू आणुन टाकतात पन दोन अडीच महिन्या पासुन अगदी मोठ्या माणसा सारखे वागायला लागलीत, मला इथे जायचे तिथे जायच , हे पहिजे ते पहिजे कुठलाही हट्ट नाही यावरून एक बाब मनाला पटते की आपण जसे वागतो त्याचे अनुकरण करुन ही मुले आपले वर्तन करीत असतात, माझ्या सह अनेकाना हा प्रश्न पडला असेल दिवस भर बाहेर खेळणारी, गोंगाट करणारी ही मुले शान्त झाली कशी, त्यांच्यात हा सय्यम आला कुठून,मला एकच सांगायचे की ही कोवळी मुले आचरण लवकर करतात बालपणीचे संस्कार हे त्यांचेवर कायम स्वरुपी रुजले जातात, हे स्वत आज आपण अनुभव घेत आहोत, माझ्या सोसाइटी मधे खुप चिमुकली मुले आहेत मी बघतो आहे खुप दिवस झाले हट्ट करने रडणे नाही बाहेर जाण्यासाठी बाबा च्या मागे लागणे नाही,गोंगाट नाही शान्त समजदार झाली मुले म्हणूनच हया बाल गोपालाचे खुप कौतुक वाटते आहे, हया कोरोना युद्धात लढणारया माझ्या पोलीस, डॉक्टर, नर्स, समाजसेवक, पत्रकार, बांधवा सोबत आपल्याला सहकार्य करणारे चिमुकली बालके यांचे ही कौतुक करावे असे मला वाटले, म्हणून हे लिहिण्याचा प्रयत्न केला, बाळानो जातिल हे पन दिवस तुम्ही सय्यम ठेवला आहे हे आमच्यासाठी खुप अभिमानसपद आहे, चांगले दिवस येतिल लवकर मग भरपूर खेळा, मस्ती करा आम्हीही तुमचा हट्ट नक्की पुर्ण करु, मित्रांनो हे नुसते वाचुन विसरुन जाऊ नका आपल्या घरातील, परिसरातील लहान मुलाना हे कौतुक बोलून दाखवा बर वाटेल त्याना, सगळ्याना प्रश्न पडला असेल हा शहानपणा या लहान बालकां मधे आला कुठून, निष्पाप असतात ही मुले देवा घरची फुले असतात ती असे समजून त्याना जिव लावा, चांगले संस्कार करा,लवकरच आपण या संकटातून बाहेर पडू , या युध्दात आपण जिंकणार आहोत, आपल्या कुटुंबाची विशेष करुन वृध्द माणसे, लहान बालके यांची काळजी घ्या अफवा पसरवू नका सकारात्मक लिखाण करा लोकामध्ये उर्जा तयार होउन त्यांची प्रतिकार शक्ती वाढेल असे काही तरी लिहा देश संकटात आहे शासनाला सहकार्य करा घरी रहा स्वस्थ रहा हीच विनंती धन्यवाद.

Previous articleनांदेड जिल्ह्यात आज पुन्हा १४७ बाधितांची भर तर ४८ रूग्ण बरे व दोघांचा मृत्यू
Next articleकेबीएचके विद्यालय खालपची कन्या मेशी केंदात प्रथम
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here