नांदेड,दि.१ ; राजेश एन भांगे
नायगांव (बा.) भाजपाच्या वातिने दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला प्रति लिटर १० रुपये वाढीव भाव व दूध भुकटीला ५० रुपये अनुदान मिळावे यासाठी रास्तारोको आंदोलन करण्यात आले. महायुतीच्या वतीने २१ जुलै २०२० ला राज्यभर शासनाला दुध भेट देऊन मागण्या मान्य नाही झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला होता. परंतु आता पर्यंत दुध प्रश्नावर काहीच निर्णय न झाल्याने १ ऑगस्ट रोजी राज्यभर आंदोलन करण्याचे आवाहन महाराष्ट्र प्रदेश भाजपा व महायुतीच्या वतीने करण्यात आले.
त्याच अनुशंघाने आज दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला १० रूपये दर वाढ व दुध बुकटिला ५०- रूपये अनुदान मिळावे व शेतकऱ्यांचे कर्ज सरसकट माफ करावे तसेच लाॕकडावुन काळातील विजबिल माफ करावे म्हणून नांदेड जिल्ह्याचे खासदार प्रतापराव पाटील चिखलिकर यांच्या नेत्रत्वाखाली आज रोजी जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांच्या ठिकाणी रास्तारोको आंदोलन करून निवेदन देण्यात आले.
तर नायगांव विधानसभेचे आमदार (भाजपा उमेदवार) श्री.राजेश पवार यांच्या नेतृत्वाखाली नायगांव बा. येथे सुद्धा आघाडी सरकारच्या विरोधात निषेध करून एल्गार आंदोलन करण्यात आले.
यावेळी भाजपा नेते दिलीपराव धर्माधिकारी, तालुकाध्यक्ष कोंडीबा पा. शिंदे, शहराध्यक्ष शंकर पा. कल्याण, भगवान पा. लंगडापूरे, प्रा.जीवन पा. चव्हाण, सुनील शिंदे, शिवाजी जाधव, राहुल नकाते, बाबासाहेब हंबर्डे, रणजीत कुरे, देविदास बोमनाळे, शरद पाटील, गजानन अशोकराव चव्हाण, साईनाथ हेंडगे, नागेश कहाळेकर, बालाजी बामणपल्ले, प्रकाश केरुरे, शिवाजी ढगे, धनंजय पा. राम पा., परमेश्वर पा. व अनेक शेतकरी बांधव हि यावेळी उपस्थित होते.