उप जिल्हा रुग्णालय देगलूर येथे आज प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान.
मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार
उप जिल्हा रुग्णालय देगलूर येथे गरोदर माता साठी विशेष तपासणी मोहीम घेण्यात येत असून तज्ञ डॉक्टर कडून तपासणी करण्यात येणार आहे…. डॉ भगवान पितळे स्त्री रोग तज्ञ हे गरोदर मातेची संपूर्ण तपासणी करणार असून डॉ अमोल बामणे रेडिओलॉजि तज्ञ हे गरोदर मातेचे सोनोग्राफी करणार आहेत…त्या सोबतच रक्त गट व इतर सर्व रक्ताच्या तपासण्या देखील मोफत होणार आहेत….
शहरातील सर्व आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी कार्यकर्त्या, आरोग्य कर्मचारी यांना गरोदर मातांना तपासणी साठी घरोघरी जाऊन त्यांना सदर शिबिराचा लाभ घेण्यासाठी प्रवृत्त करण्याचे आवाहन केले आहे…तरीही सर्व गरोदर महिलांनी सदर शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन वैद्यकीय अधीक्षक डॉ. नरेश देवणीकर यांनी केलं आहे.

