Home गुन्हेगारी देवळा तालुक्यात सख्ख्या साल्याने सख्ख्या बहिणीच्या नव-याची केली कु-हाडीने निर्घृणरित्या हत्या

देवळा तालुक्यात सख्ख्या साल्याने सख्ख्या बहिणीच्या नव-याची केली कु-हाडीने निर्घृणरित्या हत्या

55

आशाताई बच्छाव

1003142715.jpg

देवळा,भिला आहेर तालुका प्रतिनिधी: बहिणीला नांदवत नाही आणि तिच्या आजारावर उपचार करत नाही, या रागातून सख्ख्या साल्याने आपल्या मेव्हण्याचा कुऱ्हाडीने डोक्यावर वार करून निघृण खून केल्याची धक्कादायक घटना देवळा तालुक्यात घडली आहे. प्रकाश रुपेश गांगुर्डे (वय ३१, रा. सरस्वती वाडी, ता. देवळा) असे मृत तरुणाचे नाव असून, याप्रकरणी समाधान भावसा पवार (रा. खालप, ता. देवळा) याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत प्रकाश गांगुर्डे यांची पत्नी मनोरुग्ण असल्याने त्यांच्यात घरगुती वाद होते. पत्नीला नीट वागवत नाही आणि तिच्यावर दवाखान्याचा खर्च करत नाही, या कारणावरून संशयित आरोपी समाधान पवार याच्या मनात मेव्हण्याबद्दल तीव्र राग होता.
रविवारी, १० मे रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास प्रकाश गांगुर्डे हे खालप-मेशी रस्त्यावरील सिमेंटच्या पुलावर मोबाईलवर बोलत उभे होते. यावेळी समाधान पवार याने पाठीमागून येऊन प्रकाश यांच्या डोक्यावर कुऱ्हाडीने जोरदार वार केले. हा वार इतका भीषण होता की, प्रकाश गांगुर्डे यांचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच देवळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गुन्हा केल्यापासून आरोपी समाधान पवार हा फरार झाला असून, त्याच्या शोधासाठी देवळा पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रवाना झाले आहे. या घटनेमुळे देवळा परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

सदर गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदा पाटील, पोलीस उपनिरीक्षक विनय देवरे करीत आहेत. आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी विविध ठिकाणी सापळा रचला असून लवकरच त्याला अटक करण्यात येईल, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

Previous articleदेवळा तालुक्यात सख्ख्या साल्याने सख्ख्या बहिणीच्या नव-याची केली कु-हाडीने निर्घृणरित्या हत्या
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.