Home गुन्हेगारी खडक ओझर येथे ५० हजारांची लाच घेताना मंडळ अधिकाऱ्यास रंगेहाथ अटक

खडक ओझर येथे ५० हजारांची लाच घेताना मंडळ अधिकाऱ्यास रंगेहाथ अटक

136

आशाताई बच्छाव

1003113783.jpg

खडक ओझर येथे ५० हजारांची लाच घेताना मंडळ अधिकाऱ्यास रंगेहाथ अटक
चांदवड | सुनील गांगुर्डे (विभागीय संपादक):
जमिनीच्या कब्जाबाबत न्यायालयाच्या आदेशानुसार कार्यवाही करून रेकॉर्ड व कब्जा देण्यासाठी ६० हजार रुपयांची लाच मागून तडजोडीअंती ५० हजार रुपये स्वीकारताना चांदवड तालुक्यातील मंडळ अधिकारी योगिता आनंद भोये यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडल्याने महसूल विभागात खळबळ उडाली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक यांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या खडक ओझर शिवारातील वडिलोपार्जित शेती जमिनीच्या कब्जाबाबत वाद निर्माण झाला होता. या प्रकरणी न्यायालयाने तक्रारदारांच्या बाजूने निर्णय दिल्यानंतर महसूल विभागाला कब्जा देण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार तहसीलदार, चांदवड यांनी मंडळ अधिकारी योगिता भोये यांना आवश्यक कार्यवाहीचे आदेश दिले होते.
मात्र, संबंधित कार्यवाही करून तक्रारदारांना रेकॉर्ड व कब्जा देण्यासाठी स्वतःसह तलाठी व सज्जा खडक ओझर यांच्या नावाने ६० हजार रुपयांची लाचेची मागणी करण्यात आल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती. पडताळणीत तक्रार सत्य आढळून आल्यानंतर सापळा रचण्यात आला.
यानुसार वडनेर भैरव पोलीस ठाण्याच्या हद्दीत आरोपी योगिता आनंद भोये (वय ३८), मंडळ अधिकारी, जोपुळ, ता. चांदवड, रा. प्रगतीनगर, बोऱगड, म्हसरूळ, नाशिक यांना ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक नेहा सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पो. हवालदार विनोद चौधरी, पो.कॉ. अनिल गांगोडे, पो.हवा. प्रमोद चव्हाणे यांच्या पथकाने केली. तसेच पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी व अपर पोलीस अधीक्षक सुनील दोरंगे यांचे मार्गदर्शन लाभले.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणताही शासकीय अधिकारी अथवा कर्मचारी कामासाठी लाचेची मागणी करत असल्यास तात्काळ विभागाशी संपर्क साधावा.

Previous articleदेगलुरकराचां डंका महाराष्ट्र भर गाजवतोय धनाजी जोशी-सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.