Home गडचिरोली गडचिरोलीचे युवा मराठा न्यूजचे पञकार सुरज गुंडमवार राज्यस्तरीय शिवछत्रपती पुरस्काराने गौरविले जाणार

गडचिरोलीचे युवा मराठा न्यूजचे पञकार सुरज गुंडमवार राज्यस्तरीय शिवछत्रपती पुरस्काराने गौरविले जाणार

161

आशाताई बच्छाव

1002655694.jpg

गडचिरोलीचे युवा मराठा न्यूजचे पञकार सुरज गुंडमवार राज्यस्तरीय शिवछत्रपती पुरस्काराने गौरविले जाणार

आश्रयआशा फाऊंडेशन, मालेगाव तर्फे राज्यस्तरीय शिवछत्रपती पुरस्कार २०२६ जाहीर

मालेगाव येथे भव्य-दिव्य सोहळ्याचे आयोजन; मान्यवरांची उपस्थिती

गडचिरोली: सामाजिक, शैक्षणिक व बहुउद्देशीय कार्याच्या माध्यमातून समाजात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या आश्रयआशा फाऊंडेशन, मालेगाव या संस्थेतर्फे राज्यस्तरीय “शिवछत्रपती पुरस्कार २०२६” जाहीर करण्यात आला असून, गडचिरोली येथील पत्रकार सुरज गुंडमवार यांची आदर्श पत्रकारिता व समाजसेवा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल निवड करण्यात आली आहे.

समाजातील विविध प्रश्नांना वाचा फोडणे, वंचित घटकांच्या समस्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करणे, प्रशासन व नागरिक यांच्यात समन्वयाचा सेतू निर्माण करणे तसेच सामाजिक बांधिलकी जपत निर्भीड पत्रकारितेच्या माध्यमातून लोकहिताचे प्रश्न प्रभावीपणे मांडणे या कार्याची दखल घेऊन हा सन्मान जाहीर करण्यात आल्याची माहिती संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

या पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन मालेगाव येथे लवकरच भव्य-दिव्य स्वरूपात करण्यात येणार असून, कार्यक्रमास आमदार, खासदार, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार बांधव, विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक, महिला प्रतिनिधी आणि समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याचे संस्थेने कळविले आहे.

आश्रयआशा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र राऊत पाटील, उपाध्यक्ष श्री राजेंद्र तू. पवार आणि सचिव श्रीमती आशाताई बच्छाव यांच्या नेतृत्वाखाली संस्था सामाजिक, शैक्षणिक व बहुउद्देशीय उपक्रम राबवत असून राज्यभरात संस्थेचे कार्य विस्तारत आहे. समाजातील प्रेरणादायी व आदर्श व्यक्तिमत्त्वांचे कार्य समाजासमोर आणत त्यांच्या योगदानाचा सन्मानपूर्वक गौरव करण्याची परंपरा संस्थेमार्फत सातत्याने जपली जात आहे, असे पदाधिकाऱ्यांनी नमूद केले.

राज्यस्तरीय शिवछत्रपती पुरस्कार हा सन्मान सुरज गुंडमवार यांच्या पत्रकारिता क्षेत्रातील प्रामाणिक, निर्भीड व लोकाभिमुख कार्याची अधिकृत पावती मानली जात असून, गडचिरोली जिल्ह्यासाठी ही अभिमानाची व गौरवाची बाब ठरत आहे.

या भव्य सोहळ्याकडे राज्यभरातील सामाजिक व पत्रकारिता क्षेत्राचे लक्ष लागले असून, कार्यक्रमाची तयारी जोरात सुरू आहे.

Previous articleEpaper yuva maratha 8 February 2026
Next articleYuva Maratha epaper 15 February
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.