आशाताई बच्छाव
राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिनानिमित्त आरोग्याची जबाबदारी घेऊया – डॉ. नामदेवराव उसेंडी
गोंदिया, सुरज गुंडमवार ब्युरो चीफ:
आज, ७ नोव्हेंबर रोजी देशभरात राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिन साजरा करण्यात येत आहे. या दिनानिमित्त डॉ. नामदेवराव उसेंडी (माजी आमदार) यांनी जनतेला आरोग्याबाबत सजग राहण्याचे आवाहन केले आहे.
डॉ. उसेंडी यांनी म्हटले की, “कर्करोगाला हरवण्यासाठी जागरूकता हीच सर्वात मोठी ताकद आहे.” त्यांनी नागरिकांना नियमित आरोग्य तपासणी करण्याचे, संतुलित आहार घेण्याचे, नियमित व्यायाम करण्याचे आणि शरीरात होणाऱ्या बदलांकडे दुर्लक्ष न करण्याचे आवाहन केले.
त्यांनी पुढे सांगितले की, वेळेत निदान आणि योग्य उपचार घेतल्यास कर्करोगावर मात करणे पूर्णतः शक्य आहे. समाजात आरोग्याबद्दल जागरूकता निर्माण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.
“आजच्या या राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिनानिमित्त स्वतःच्या आणि समाजाच्या आरोग्याची जबाबदारी आपण सर्वांनी घ्यावी,” असे आवाहन डॉ. उसेंडी यांनी केले.
या संदेशाद्वारे डॉ. उसेंडी यांनी नागरिकांना निरोगी जीवनशैली स्वीकारण्याचे आणि कर्करोगाविरुद्ध एकत्रितपणे लढा देण्याचे प्रबोधन केले.






