Home गडचिरोली आमदार डॉ. मिंलिदजी नरोटे यांची स्नेहनगर परिसराला भेट — नागरिकांच्या समस्या जाणून...

आमदार डॉ. मिंलिदजी नरोटे यांची स्नेहनगर परिसराला भेट — नागरिकांच्या समस्या जाणून तातडीने दिले कार्यवाहीचे निर्देश

391

आशाताई बच्छाव

1002159947.jpg

आमदार डॉ. मिंलिदजी नरोटे यांची स्नेहनगर परिसराला भेट

— नागरिकांच्या समस्या जाणून तातडीने दिले कार्यवाहीचे निर्देश

गडचिरोली, सुरज गुंडमवार ब्युरो चीफ—
गडचिरोली शहरातील स्नेहनगर परिसराला आमदार डॉ. मिंलिदजी नरोटे यांनी आज भेट देत नागरिकांशी संवाद साधला आणि स्थानिक पातळीवरील विविध समस्या जाणून घेतल्या. या भेटीदरम्यान परिसरातील विकासकामांची पाहणी करण्यात आली आणि नागरिकांकडून थेट सूचना घेऊन तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधित विभागांना देण्यात आले.

भेटीदरम्यान गेट व सभागृहाची दुरुस्ती, सभागृहात नवीन स्टाईल व लाईट्स (हायमास्ट) बसविणे, सिमेंट खुर्च्यांची व्यवस्था, तसेच शिव मंदिर परिसरातील ओपन जिमची दुरुस्ती या महत्त्वाच्या बाबींवर चर्चा करण्यात आली. यासोबतच जय बजरंगबली विश्वस्त मंडळाच्या कामकाजाबाबतही मार्गदर्शनात्मक चर्चा पार पडली.

डॉ. नरोटे यांनी सांगितले की, “गडचिरोली शहरातील नागरिकांच्या सुविधा, सौंदर्यीकरण आणि सर्वांगीण विकासासाठी आमचे प्रयत्न सातत्याने सुरू राहतील. नागरिकांच्या सहकार्याने गडचिरोलीला अधिक प्रगत आणि समृद्ध शहर बनविण्याचा आमचा संकल्प आहे.”

या भेटीत भाजपा शहराध्यक्ष श्री. अनिलजी कुनघाडकर, जिल्हा उपाध्यक्ष श्री. अनिलजी पोहनकर, तसेच स्थानिक युवा कार्यकर्ते श्री. आशिषजी मेश्राम, श्री. राहुलजी खंडारे, श्री. स्वप्निलजी खंडारे, श्री. आकाशजी भोयर, श्री. प्रतिकजी टेप्पलवार, श्री. अक्षयजी बोदलकर, श्री. अंकुशजी नक्षीने, श्री. स्वप्निलजी बुरांडे आणि श्री. योगेशजी बुरांडे उपस्थित होते.

या भेटीमुळे स्थानिक नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, विकासकामे गतीमान होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.