आशाताई बच्छाव
साक्री पंचायत समिती खोरी गणा मधून पंकज देशमुख यांचा उमेदवारी करण्याचा ठाम निर्धार
साक्री, संदीप वसंतराव पाटील ब्युरो चीफ
खोरी गणा मधून पंकज देशमुख यांचा उमेदवारी करण्याचा ठाम निर्धार
उमेदवारी करणार असल्याचे निश्चित झाल्याने, गणात नवचैतन्याची लाट उसळली आहे.
मुळचे पन्हाळी पाडा टि टा णे ग्रुप ग्रामपंचायत येथील रहिवासी असलेले पंकज देशमुख हे उच्च शिक्षीत व सुशिक्षित असल्याने त्याशिवाय युवा सामाजिक कार्याचे आवड सर्वसामान्यांचे हित जपणारे. असल्याने त्यांची उमेदवारी ही निश्चितच विजयश्री खेचून आणेल अशीच चर्चा सध्या तरी खोरी गणामध्ये ऐकावयास मिळत आहे. पंकज देशमुख. हे गेल्या टि टा णे ग्रामपंचायत निवडणुकीत काही मताच्या फरकाने पराभव झाला परंतु तरीही धार्मिक व सामाजिक कार्यात दोन पटीने सक्रिय आहेत खोरी गणासाठी पंकज देशमुख प्रमुख दावेदार म्हणून वर्चस्व चर्चेच्या माध्यमातून त्या गणातील जनता व्यक्त करत आहे. देशमुख यांची खरी ताकत असे आहे. की आदिवासी पट्टा पाढे व टिटाणे ग्रुप ग्रामपंचायत आहे त्यापैकी पन्हाळी पाडा, आंबेमोहोर, वसंत नगर, इसरर्डे अशी ग्रामपंचायत आहे म्हणून पंकज देशमुख यांची दावेदारी प्रमुख मानली जात आहे इतरही गणातील गावांचा विचार केला असता आदिवासी समाजाची मते अधिक असल्याने व ग्रामपंचायतचे गटनेते प्रशांत देवरे, सामाजिक कार्यकर्ते रवींद्र देवरे, सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत देवरे,कॉन्ट्रॅक्टर दिग्विजय ठाकरे, संदीप पाटील, आदिवासी संघटनेचे पदाधिकारी, तसेच विविध क्षेत्रातील लोकांचा पाठिंबा मिळत आहे पंकज देशमुख यांचे पारडे जड आहे अशी चर्चा सर्व गावांमध्ये सुरू आहे. अनेक सामाजिक कार्यात सहभागी होऊन सर्वसामान्य गोरगरीबांच्या हक्कासाठी वेळोवेळी शासनदरबारी पाठपुरावा केला आहे.त्यामुळे त्यांचे कार्य हे खोरी गणासाठी सगळ्यांना अगदी जवळून परिचीत आहे.
पंकज देशमुख यांच्या या उमेदवारीस आदिवासी संघटना तसेच सामाजिक व धार्मिक संघटना, अशा आदिवासींच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या संघटनेने जाहिर पाठींबा दर्शविला असल्याचे पंकज देशमुख यांनी सांगितले.






