आशाताई बच्छाव
भाजप बंगाली आघाडी जिल्हाध्यक्ष सुरेश शहा यांचा मछली मछली टोला येथे भेट
गडचिरोली, सुरज गुंडमवार ब्युरो चीफ- भेटीदरम्यान गावातील नागरिकांशी संवाद साधला नागरिकांनी चांगला प्रतिसाद देत गावात केलेल्या विकास कामा बद्दल सुद्धा चर्चा केली या गावात माजी आमदार डॉ देवराव होळी यांच्या कार्यकाळात माझ्या प्रयत्तानाने जवळपास 1 कोटी चे सी सी रोड जिल्हा परिषद शाळेत पॅविंग ब्लॉक दुरुस्तीचे काम तसेच या गावात स्थानिक निधीतून सभामंडप देण्याचे काम केले कोट्यावधीचे काम या छोट्याशा गावात आपण दिले असून येणाऱ्या निवडणुकीत आपल्या सोबत संपूर्ण गाव सोबत राहील असे वचन दिले
यावेळी गावाकऱ्यांनी शाळेची इमारत जीर्ण अवस्थेत असून नवीन इमारत मंजूर करावे अशी मागणी केली यावर प्रतिक्रिया देताना सुरेश शहा यांनी सांगितले कि हा विषय आपण गडचिरोली विधानसभेचे लोकप्रिय आमदार डॉ मिलिंदजि नरोटे यांना सांगून लवकरात लवकर मार्गी लावू असे आश्वासन दिले
यावेळी शाळा समितीचे अध्यक्ष गावचे सरपंच उपसरपंच ग्राम पंचायत सदस्य तथा गावकरी उपस्थित होते






