Home नाशिक दैनिक युवा मराठा चे संपादक राजेंद्र पाटील राऊत यांना साई जीवनगौरव पुरस्कार...

दैनिक युवा मराठा चे संपादक राजेंद्र पाटील राऊत यांना साई जीवनगौरव पुरस्कार जाहीर

481

आशाताई बच्छाव

1002113315.jpg

दैनिक युवा मराठा चे संपादक राजेंद्र पाटील राऊत यांना साई जीवनगौरव पुरस्कार जाहीर

सामाजिक व वृत्तपत्र क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची घेतली दखल

दैनिक युवा मराठा प्रतिनिधी 

निफाड रामभाऊ आवारे 
दैनिक युवा मराठा न्यूज पेपर वेब न्यूज चॅनलचे मुख्य संपादक, आश्रय आशा फाऊंडेशन चे संस्थापक तसेच सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या लोकहित माहिती अधिकार पत्रकार पोलीस संरक्षण संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र पाटील राऊत यांना विविध क्षेत्रातील सामाजिक कार्य व महाराष्ट्र राज्यातील वृत्तपत्र क्षेत्रातील भरीव कामगिरी लक्षात घेता साई विकास प्रतिष्ठान व बी.बी.सी.फिल्म प्रोडक्शन महाराष्ट्र राज्य
यांच्या वतीने साई जीवनगौरव पुरस्कार २०२६ जाहीर झाला आहे अशी माहिती ओम साई विकास प्रतिष्ठानचे सुदाम संसारे सर यांनी दिली आहे.
अत्यंत प्रतिष्ठेचा व मानाचा समजला जाणारा हा पुरस्कार १० जानेवारी २०२६ रोजी शिर्डी येथे एका विशेष समारंभात प्रदान केला जाणार आहे. राजेंद्र पाटील राऊत यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत स्व-बळावर संपूर्ण महाराष्ट्रात युवा मराठा महासंघ, आश्रयआशा फाऊंडेशन, लोकहित माहिती अधिकार पत्रकार व पोलीस संरक्षण संघटनेच्या माध्यमातून अल्पावधीत नावलौकिक मिळविला आहे.विविध आंदोलने करून संघर्षात्मक भुमिका घेत सर्वसामान्य गोरगरीबांच्या हक्कासाठी त्यांनी लढा दिलेला आहे.राऊत पाटील यांना यापूर्वी अनेक पुरस्कार मिळालेले असून,आताचा साई जीवनगौरव पुरस्कार हा आपल्याच मायभूमीत अहिल्यानगर जिल्ह्यात पहिल्यांदा मिळत असल्याने आपण भारावून गेलो असल्याची भावना राजेंद्र पाटील राऊत यांनी व्यक्त केली आहे.मुळचे अहिल्यानगर जिल्ह्यातील असलेले राजेंद्र पाटील राऊत यांनी आपल्या कारकीर्दीचा श्री गणेशा नाशिक जिल्ह्यातील मालेगाव जवळील कौळाणे (निं) येथून केल्याने त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल अनेकांनी अभिनंदन केले आहे.
राजेंद्र राऊत पाटील यांना मानाचा व सन्मानाचा साई जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल लोकहित माहिती अधिकार पत्रकार संरक्षण संघटनेचे महाराष्ट्र राज्य सचिव आशाताई बच्छाव, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा वारकरी मंच प्रदेश प्रसिद्धी प्रमुख रामभाऊ आवारे सर, ह भ प दिलीप महाराज पाटील सातारा ,प्रदेश उपाध्यक्ष राजा बाबा होळकर , मुख्याध्यापक गोरखनाथ कुनगर सर, महाराष्ट्र सचिव उमेश प्रभाकर कुलकर्णी, ह भ प शांताराम महाराज साळुंखे आदींसह सर्व पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहे.

Previous articleनांदेड येथे आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थेकडून ऋणानुबंध सोहळ्याचे आयोजन.
Next articleकळमदरे गावी माजी विद्यार्थी मेळावा – “माझी शाळा माझा अभिमान” स्नेहमेळावा संपन्न 
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.