आशाताई बच्छाव
अज्ञान व अयोग्य व्यक्तींवर ठेवलेला अती विश्वास जीवनातील तणावाचे माहेरघर
प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये सुखदुःखाच्या गोष्टी घडत असतात परंतु त्या पलीकडे जाऊन आपल्या जीवनात येत असलेला तणाव कशामुळे व कोणामुळे निर्माण झाला? हे शोधणे अत्यंत महत्त्वाचे असून त्यातून योग्य मार्गाने वाटचाल करत असलेला व्यक्ती निश्चितच यशाच्या मार्गाने आपला जीवन प्रवास सुरू करत असतो.
कोणत्याही व्यक्तीला आपल्या जीवनात येत असलेला ताण तणाव जन्मापासून मिळत नाही. परंतु तो ताण तणाव खऱ्या अर्थाने आपणच निर्माण करत असतो याकरिता ताणतणावाच्या गोष्टींकडे होईल तेवढे दुर्लक्ष कर नक्कीच महत्त्वाचे आहे. जीवनातील ताण तणाव हे आपल्याला जन्मापासून मिळत नाहीत तर आपण आपलं जीवन कोणत्या मार्गाने मार्गक्रमण करतोय त्या नुसार त्या रस्त्यावर असणारे सहप्रवासी आहेत आपण ज्ञानाच्या मार्गाने सत्य व एकनिष्ठता ठेवून मार्गक्रमण केले तर मग मात्र तणाव कुठेही दिसणार नाहीत. पण जर आपण अज्ञान मार्गावर मार्गक्रमण केले तर मग मात्र ताण तणाव निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. ताण तणाव ही मनुष्याच्या दुःखाचे साम्राज्य आहे. मोह, माया, स्वार्थ, लबाडी, खोटेपणा ज्या ठिकाणी निवास करतात त्या बहुतेक ठिकाणी अज्ञान निवास करत असते. आणि जिथं अज्ञान असतं तिथं ताण तणाव यांचा घरोबा असतोच.मनुष्याच्या जीवनात ताण तणावाचा घरोबा झाला की त्यातून बदनामीतुन नुकसान होऊन मानसिक स्वास्थ्य बिघडल्याशिवाय राहतच नाही. जितक जास्त अज्ञान व भोळसटपणा, नको त्या व्यक्तीवर अति विश्वास ठेवला तर तितकाच जास्त ताण तणाव येत असतो. अज्ञान व दुसऱ्यावर ठेवलेला अतिविश्वास हेच आपल्या जीवनांतील तणावाचे माहेर घर आहे. तणाव हा अनंत समस्यांचे मुळ आहे व तणावाचं कारण अज्ञान आहे म्हणजे मुख्यत्वे तणाव हे अज्ञानाचे प्रथम अपत्य आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. वय कोणतही असो म्हणजे क्षेत्र कोणतही असु द्या महिला पुरुष या पैकी कोणीही असु द्या अंतिमतः ज्ञान व योग्य व्यक्तीची पारख करून ठेवलेला विश्वास हेच सदैव तणाव मुक्त राहण्यासाठी आवश्यक असलेली संजीवनी.
रामभाऊ आवारे
राज्य प्रसिद्धी प्रमुख युवा मराठा महासंघ






