आशाताई बच्छाव
शिर्डीत १० जानेवारीला भव्य व दिव्य पुरस्कार सोहळा
विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी
दैनिक युवा मराठा
निफाड प्रतिनिधी रामभाऊ आवारे
ओम साई विकास प्रतिष्ठान व बी.बी.सी.फिल्म प्रोडक्शन महाराष्ट्र राज्य निर्मित साई जीवनगौरव समाजभूषण पुरस्कार वितरण समारंभ२०२६ हा राष्ट्रीय पातळीवरील पहिलाच भव्य दिव्य स्वरूपातील पुरस्कार दिनांक. १० जानेवारी २०२६ वार शनिवारी ठिक सकाळी १०.वाजता साई च्या पावन व पवित्र भुमी शिर्डीत परिवार लाॅन्स बॅंकेट हाॅल न्यु रिंग रोड सिटी मार्केट शेजारी शिर्डीत होत आहे. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा या भव्य दिव्य पुरस्कार सोहळ्यात साई जीवनगौरव पुरस्काराने सन्मान केला जाणार आहे. या सुंदर क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी आपणही आपले नाव नोंदणी करून पुरस्काराचे धनी व्हावे अशी आव्हान साई जीवन गौरव पुरस्कार निवड समितीचे मुख्य आयोजक सुदाम संसारे सर यांनी दिली आहे.
या भव्य व दिव्य पुरस्कार सोहळ्यास महाराष्ट्र राज्यातील सुमारे ७०० ते८०० लोकांची उपस्थिती राहणार आहे.या पुरस्कार सोहळ्यास सिने क्षेत्रातील नामवंत सेलिब्रिटीज व सामाजिक क्षेत्रातील नामवंत समाज सेवक व प्रसिद्ध उद्योजक उपस्थित राहुन त्याच्या शुभ हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.या महाराष्ट्र राज्य व इतर ही राज्यातील वेगवेगळ्या ३६ प्रकारच्या क्षेत्रात काम करत असलेल्या व्यक्ती व संस्थांना संधी मिळणार आहे पुरस्कारार्थी मान्यवरांना हा मानाचा ,सन्मानाचा व प्रतिष्ठेचा पुरस्कार देण्यात येणार आहे.या पुरस्कार सोहळ्यास आपले नाव नोंदणी दिनांक. ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत करणे आवश्यक आहे.आपली नाव नोंदणी 9689467506 या मोबाईल नंबर वर करायची आहे.शेवटची मुदत फक्त तीनच दिवस शिल्लक राहीली आहे.तरी त्वरित आपले नाव पुरस्कारासाठी लवकरात लवकर नांव नोंदणी करावी.हा पुरस्कार राष्ट्रीय पातळीवरील आहे म्हणून यास अतिशय महत्व प्राप्त होत आहे.अधिक माहितीसाठी वरील नंबर वर संपर्क साधावा असेही आवाहन करण्यात आले आहे.