Home सामाजिक टीळेकरवाडी ग्रामसभेत घेण्यात आलेला निर्णय इतर ग्रामपंचायतींसाठी प्रेरणादायी, शासनानेही ह्या चांगल्या निर्णयाची...

टीळेकरवाडी ग्रामसभेत घेण्यात आलेला निर्णय इतर ग्रामपंचायतींसाठी प्रेरणादायी, शासनानेही ह्या चांगल्या निर्णयाची दखल घ्यावी…..महंत.श्री.गोपालव्यास कपाटे महानुभाव….

351

आशाताई बच्छाव

1001997971.jpg

टीळेकरवाडी ग्रामसभेत घेण्यात आलेला निर्णय इतर ग्रामपंचायतींसाठी प्रेरणादायी, शासनानेही ह्या चांगल्या निर्णयाची दखल घ्यावी…..महंत.श्री.गोपालव्यास कपाटे महानुभाव.पुणे , उमेश पाटील ब्युरो चीफ-…टीळेकरवाडी येथे नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत आई वडीलांचा सांभाळ नाही तर वारसाहक्क नाही.हा सर्वानुमते ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला.ह्या निर्णयाचे समाजातील सर्व स्तरातून टीळेकरवाडीचे सरपंच श्री गोवर्धन टीळेकर व सर्व सदस्य ग्रामपंचायत अधिकारी ग्रामस्थ यांचे कौतुक व अभिनंदन होत आहे.या प्रसंगी महंत.श्री.गोपालव्यास कपाटे महानुभाव यांनीही हा निर्णय कौतुकास्पद असल्याने संबंधितांचे अभिनंदन केले.या प्रसंगी बोलतांना महंत.श्री.गोपालव्यास कपाटे म्हणाले आज समाजात आई वडील हे मातृ देवो भव, पीतृ देवो भव देवतातुल्य आहे, हे आपण ग्रंथामधे वाचतो. त्याची अंमलबजावणी ही कृतीतून झाली पाहीजे.म्हणून मी आताच्या पिढीला आवाहन करतो की कर्तव्याची जाणीव,भावना ठेवून आपल्या आई वडीलांचा सांभाळ शेवटच्या श्वासापर्यंत चांगल्या पध्दतीने करावा.समाजात जनजागृती होण्यासाठी हा निर्णय योग्य असल्याचे मत महंत.श्री.गोपालव्यास कपाटे महानुभाव यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले

Previous articleअखेर माजी समाज कल्याण सभापती यांच्या आंदोलनाचा प्रशासनाने घेतला धसका
Next articleशिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेनेच्या नासिक जिल्हा समन्वयक पदी रामायणाचार्य हभप भास्कर नाना रसाळ
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.