Home उतर महाराष्ट्र आखाडे गावात लुपिन फाऊंडेशन मार्फत लुपिन पशुसंवर्धन शाळा संपन्न 

आखाडे गावात लुपिन फाऊंडेशन मार्फत लुपिन पशुसंवर्धन शाळा संपन्न 

219

आशाताई बच्छाव

1001940484.jpg

आखाडे गावात लुपिन फाऊंडेशन मार्फत लुपिन पशुसंवर्धन शाळा संपन्न
साक्री संदीप वसंतराव पाटील ब्युरो चीफ -कृषी आधारित उपजीविका सक्षमीकरण कार्यक्रम अंतर्गत ( अ॓बल प्रकल्प )
अंतर्गत शेतकऱ्यांसाठी विशेष मार्गदर्शन कार्यक्रम
लुपिन पशुसंवर्धन शाळा
प्रमुख मार्गदर्शक मा.श्री. डॉ. शरद पंडित सर सहाय्यक आयुक्त (पशुसंवर्धन विभाग) यांच्या प्रमुख उपस्थितीत खालील मुद्द्यावर चर्चासत्रातून मार्गदर्शन करण्यात आले.
गोठा व्यवस्थापन,चार व्यवस्थापन, आरोग्य व्यवस्थापन उपचार व पर्याय, लसीकरणाची गरज, जनावरांची काळजी, जंतनिर्मूलन, मुरघास तंत्रज्ञान, वैध्यत्व निर्मूलन या मुद्द्यावर सविस्तर चर्चासत्रातून मार्गदर्शन करण्यात आले. तसेच कार्यक्रमाचे उद्दीष्ट शेतकऱ्यांना व पशुपालकांना शास्त्रशुद्ध पद्धतीने दुध उत्पादन करून नफा वाढविणे अशाच बर्‍याच विषयावर सविस्तर मार्गदर्शन करून मार्गदर्शन करण्यात आले. सदर कार्यक्रमात निजामपुर क्लस्टर मॅनेजर प्रशांत सर यांच्या मार्गदर्शनात पशुवैद्यकीय डॉक्टर दर्शन भावसार सर यांच्या उपस्थितीत लुपिन सारथी योगेश सुर्यवंशी यांनी नियोजन केले तसेच गावातील प्रगतीशील शेतकरीवर्ग दूध उत्पादक शेतकरी सदर प्रशिक्षणात उपस्थितीत होते.