Home उतर महाराष्ट्र नगर मनमाड रस्ता दुरुस्तीसाठी राहुरी फॅक्टरी येथे रास्ता रोको आंदोलन 

नगर मनमाड रस्ता दुरुस्तीसाठी राहुरी फॅक्टरी येथे रास्ता रोको आंदोलन 

194

आशाताई बच्छाव

1001937392.jpg

नगर मनमाड रस्ता दुरुस्तीसाठी राहुरी फॅक्टरी येथे रास्ता रोको आंदोलन
अहिल्यानगर प्रतिनिधी कारभारी गव्हाणे-मनमाड रस्ता दुरुस्तीचे काम लवकरात -लवकर व्हावे, यासाठी रस्ता कृती समितीने आज (ता.१०) सकाळी राहुरी फॅक्टरी येथे केलेल्या रास्ता-रोको आंदोलनात जिल्हाधिकारी पंकज आशिया यांची देखील गाडी आंदोलनकर्त्यांनी अडवल्याने काही काळ चांगलाच तणाव निर्माण झाला होता. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने जिल्हाधिकाऱ्यांना पर्यायी मार्गाने शिर्डीकडे जावे लागले.

सुमारे तासभर झालेल्या या रास्ता रोकोने अनेकांची तारांबळ उडाली. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अभियंता सूरज कदम यांनी आंदोलकांचे निवेदन स्वीकारले. प्राधिकरणाच्या वतीने आंदोलकांना लवकरच लेखी उत्तर दिले जाणार असल्याचे सांगण्यात आले. त्या आश्वासनावर आंदोलन मागे घेण्यात आले. कृती समितीचे वसंत कदम ,अनिल येवले, प्रशांत मुसमाडे, आदिनाथ कराळे ,सुधाकर आदिक, सुनील विश्वासराव, जयसिंग घाडगे, दीपक त्रिभुवन यांची यावेळी भाषणे झाली.

Previous articleदुचाकी व चारचाकी वाहने चोरणारा आरोपी गजाआड
Next articleअल्पवयीन वाहन चालकांवर कारवाई ६,३८,१०० रुपये दंड वसूल
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.