आशाताई बच्छाव
सततच्या पावसाने संत्रा गळती सुरूच- डॉ. अमोल विरकर
मालेगांव (दाभाडी प्रतिनिधी):
संत्रा फळाला ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पाऊस कमी पाहिजे असतो. पण यावर्षी सततच्या पावसाने संत्रा फळगळ मोठ्या प्रमाणात सुरू झाली. ऑगस्ट महिन्यापासून संत्रा फळगळती वाढल्याने संत्रा झाडे रिकामे होताना दिसत आहे. तसेच झाडावर नवनवीन किडी, रोग, तसेच बुरशी पाहायला मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. शेतकरी कर्जबाजारी झाला आहे, सोबतच हातातील
शेतमाल जाणार की काय, याची चिंता वाटू लागली आहे, असे प्रतिपादन छत्रपती शिवाजी महाराज कृषी विज्ञान संकुलातील शास्त्रज्ञ डॉ. अमोल विरकर यांनी केले.
यावर्षी पहिल्यांदाच आंब्या बाहेरच्या संत्र्याला काहीतरी भाव आहे, शेतकरी काहीतरी स्वप्न पाहत होता, पण सततच्या पावसाने शेतकऱ्यांचे स्वप्न भंग केले असल्याने शेतकरी पुन्हा कर्जबाजारीकडे वळला आहे. कारण ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात फळगळती झाली आहे. फळगळती अजून सुरूच आहे, त्यामुळे संत्रा झाड रिकामे होताना दिसत आहे. सर्व शेतकऱ्यांच्या शेतात संत्रा फळांचा सडा पडलेला दिसत आहे. त्यात अजून वातावरण बदलल्यामुळे किडींचे प्रमाण वाढवून फळगळ सुरूच आहे, तर कुठे कोळशी मोठ्या प्रमाणाने बागेत पसरल्याने संत्रा फळ काळे आणि लालसर पाहायला मिळत आहे. संत्रा झाडांची पाने पिवळे पडून झाडे वाळत चालली आहे. झाडावरच संत्रा फळे पिवळी झालेली दिसत आहेत, तरी पण शेतकरी कृषी सेवा केंद्रामध्ये जाऊन विनाकारण फवारणी खर्च करत आहे. फायटॉथोरा (Phytopthora) बुरशीची समस्या वाढत असल्याने संत्रा गळती वाढत चाललेली आहे. कृषी केंद्रातील महागडे बुरशीनाशक वापरून सुद्धा शेतकऱ्यांना परिणाम मिळत नाही आहे. त्यामुळे केलेला खर्च वाया जात आहे. संत्रावर उपाययोजना करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज कृषी विज्ञान संकुलातील उद्यानविद्या विभागाचे डॉ.अमोल विरकर म्हणाले, बागेतील पाण्याचा निचरा योग्य रीतीने करावा तसेच खोडापाशी पाणी सासून न देणे, खाली खोडालगत नवीन पालवी आलेली असेल तर ती लगेच कट करून त्या जागी बुरशीनाशकची फवारणी करावी, फळमाशी व कोळशीसाठी सापळे तसेच रात्रीच्या वेळेस सहा ते आठ वाजेच्या दरम्यान काँग्रेस तसेच लिंबाच्या पानाचा धूर करावा, जेणेकरून फळमाशी व कोळशी ही किड रात्रीचा फळावरती प्रादुर्भाव करते, म्हणून आपण रात्रीच्या वेळेस धूर करून त्या बागेत किडीला येऊन द्यायचे नाही, तसेच एका मसलिन कापडात एक चमचा थायमेट आणि एक चमचा युरिया टाकून तो दहा झाडे सोडून तो झाडाला बांधावा जेणेकरून जसं जसं युरिया पाणी सोडेल तसं तसं थायमेटचा उग्र वास येईल, त्यामुळे फळमाशी व कोळशी ही झाडाच्या किंवा फळाच्या जवळ येत नाही. असे प्रतिसाद विरकर यांनी शेतकऱ्यांना दिले. उपस्थित मोसंबी व संत्रा शेतकरीवर्ग भूषण निकम समाधान अहिरे, सतीश हिरे, पंडित नाना हिरे, राजेंद्र हिरे, बाबा हिरे, सतीश बच्छाव, प्रवीण पवार, नितीन कोर, शरद कोर आदी उपस्थित होते.






