Home उतर महाराष्ट्र संघर्षनामा प्रिंट अँड इलेक्ट्रॉनिक मीडिया, महाराष्ट्र राज्य आयोजित “संघर्षरत्न – समाजभूषण सोहळा...

संघर्षनामा प्रिंट अँड इलेक्ट्रॉनिक मीडिया, महाराष्ट्र राज्य आयोजित “संघर्षरत्न – समाजभूषण सोहळा २०२५” चे आयोजन!!

161
0

आशाताई बच्छाव

1001831159.jpg

संघर्षनामा प्रिंट अँड इलेक्ट्रॉनिक मीडिया, महाराष्ट्र राज्य आयोजित “संघर्षरत्न – समाजभूषण सोहळा २०२५” चे आयोजन!!

_आज १५ ऑगस्ट 2025 रोजी विविध क्षेत्रांतील दिग्गजांचा राज्यस्तरीय संघर्षरत्न समाजभूषण पुरस्काराने सन्मान_

श्रीगोंदा/अहिल्यानगर प्रतिनिधी कारभारी गव्हाणे– सामाजिक, पत्रकारिता, उद्योग, अध्यात्म, राजकारण, समाजकारण आदि विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यासाठी संघर्षनामा प्रिंट अँड इलेक्ट्रॉनिक मीडिया, महाराष्ट्र राज्य आयोजित राज्यस्तरीय “संघर्षरत्न –समाजभूषण सोहळा २०२५” निमित्ताने संघर्षरत्न जीवनगौरव पुरस्कार समवेत विविध पुरस्कारांचे वितरण अभिनव पद्धतीने करण्यात येणार आहे. या सोहळ्यात संघर्षरत्न जीवनगौरव, आदि विविध पुरस्कारांचे वितरण होणार असून महाराष्ट्रातील प्रतिष्ठित मान्यवरांचा सन्मान करण्यात येणार आहे. यामध्ये, संघर्षरत्न समाजभूषण पुरस्कार, पत्रकारिता, सामाजिक कार्य, अध्यात्म, उद्योग आदी संघर्षसिद्ध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांना संघर्ष रत्न समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

हा अभिनव सोहळा शुक्रवार, दिनांक १५ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी १.०० वाजता तुळशीदास मंगल कार्यालय, पेडगाव रोड, श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर येथे पार पडणार असून, शुभहस्ते मा. ना. प्रा. राम शिंदे (विधान परिषद सभापती, महाराष्ट्र राज्य), माननीय श्री परमपूज्य सुदाम महाराज गोरख गुरुजी, पद्मश्री पोपटराव पवार, खासदार निलेश लंके, मा. श्री. बबन (दादा) पाचपुते (माजी मंत्री, महाराष्ट्र राज्य, श्रीगोंद्याचे भाग्यविधाते), मा. आमदार संग्राम भैय्या जगताप , माननीय श्री आमदार विक्रमसिंह पाचपुते , माननीय आमदार काशिनाथ दाते सर, मा. श्री. बाबासाहेब भोस (माजी अध्यक्ष, जिल्हा परिषद अहिल्यानगर), म्हाडा नाशिक विभागाचे माजी अध्यक्ष शिवाजीराव ढवळे, जी के प्लास्टिक च्या सर्वेसर्वा उद्योगभूषण विजयाताई गरुडकर, वृद्धेश्वर मल्टीस्टेटचे चेअरमन विठ्ठलराव वाडगे आदी मान्यवरांच्या शुभहस्ते विविध पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत होणार आहे.

या सोहळ्याचे प्रमुख आयोजक संपादक मेजर भिमराव उल्हारे असून, निमंत्रक म्हणून माधव उल्हारे, मेजर निलकंठ उल्हारे व संतोष शिंदे सक्रिय आहेत. संघर्षनामा संयोजक मंडळाच्या वतीने सर्व पत्रकार बांधव, राजकिय,सामाजिक संघटना, मान्यवर व नागरिकांना या सोहळ्यास बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Previous articleमेशी येथे भरदिवसा धाडसी चोरी लाखो रुपयांचा ऐवज लंपास
Next articleयुवा मराठा न्यूज चॅनलच्या बातम्या सुरूच राहणार…. भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here