Home नांदेड ॲड सुरेश जयवंतराव देसाई देगावकर यांचे निधन रविवारी देगाव येथे होणार अंत्यसंस्कार.

ॲड सुरेश जयवंतराव देसाई देगावकर यांचे निधन रविवारी देगाव येथे होणार अंत्यसंस्कार.

331

आशाताई बच्छाव

1001778569.jpg

 

ॲड सुरेश जयवंतराव देसाई देगावकर यांचे निधन रविवारी देगाव येथे होणार अंत्यसंस्कार.

मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार

देगाव ता. देगलूर येथील प्रतिष्ठित ज्येष्ठ नागरिक तथा जेष्ठ सरकारी विधीज्ञ सुरेशराव जयवंतराव देसाई देगावकर यांचे दीर्घ आजाराने शनिवार दि. २ ऑगस्ट २५ रोजी सायंकाळी ५ वाजता दुःखद निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय ८१ वर्षे होते. एडवोकेट सुरेश देसाई हे प्रख्यात विधीज्ञ म्हणून संपूर्ण जिल्ह्यात परिचित होते ते अनेक वर्ष सरकारी वकील म्हणूनही कामकाज पाहिले होते. ते काही काळ देगलूर नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष म्हणूनही कार्यरत होते. शहरातील जवाहर क्लबसह इतर अनेक सहकारी संस्थांशी त्यांचा निकडचा संबंध होता.
त्यांच्यावर रविवार दि. ३ ऑगस्ट २५ रोजी दुपारी १:०० वाजता त्यांच्या मूळ गावी देगाव( बुद्रुक) ता. देगलूर येथील शेतात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
त्यांच्या पश्चात पत्नी भारतीताई देसाई, शिवस्मारक समितीचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक अंकुश देसाई देगावकर, डॉ. अक्षय देसाई देगावकर हे दोन मुले, एक मुलगी, बंधू कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अशोक देसाई देगावकर, पांडुरंग देसाई देगावकर, पुतणे बृहन्मुंबई महापालिकेचे उपायुक्त योगेश देसाई देगावकर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राहुल देसाई देगावकर यांच्यासह नातू, पंणतू असा मोठा परिवार आहे.

Previous articleमालेगाव बॉम्बस्फोटातील सर्व आरोपींची निर्दोष सुटका ! – निकाल देणारे न्यायाधीश मूळचे बुलढाण्याचे !
Next articleचिखलीत अपघात : दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू !
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.