Home नांदेड शासकीय वाळू डेपोतून गरजू ग्राहकास घरकुल लाभार्थ्यांना वाळू उपलब्ध.

शासकीय वाळू डेपोतून गरजू ग्राहकास घरकुल लाभार्थ्यांना वाळू उपलब्ध.

186

आशाताई बच्छाव

1001770542.jpg

शासकीय वाळू डेपोतून गरजू ग्राहकास घरकुल लाभार्थ्यांना वाळू उपलब्ध.

मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार

नांदेड : जिल्ह्यातील घरकुल लाभार्थी व खाजगी ग्राहकांना 1 ऑगस्ट 2025 पासून आपल्या जवळच्या वाळू डेपोमधून वाळू उपलब्ध करुन देण्यात येत आहे. त्यासाठी संबंधीत गरजु ग्राहकांना ऑनलाईनद्वारे महाखनिज प्रणालीवर सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत कालावधीत (सार्वजनिक सुट्टी वगळून) वाळू बुकिंग करुन बुकिंग केलेल्या दिनांकापासून 7 दिवसाच्या आत वाळू डेपोतून वाळू उचल करणे बंधनकारक राहणार आहे.

त्यामुळे ज्या ग्राहकांना वाळूची आवश्यकता आहे त्या ग्राहकांनी शासनाचे महाखनिज प्रणालीवर mahakhanij.maharashtra.gov.in ऑनलाईन बुकिंग करुन वाळू उचल करावी, असे प्रशासनाने जाहीर केले आहे. याबाबतची सविस्तर माहिती जिल्हाधिकारी नांदेड यांच्या अधिकृत संकेतस्थळ nanded.gov.in वर प्रसिद्ध केले आहे.

Previous articleजिल्ह्यात डाक कार्यालयातील आर्थिक/पत्रव्यवहार 2 ऑगस्ट रोजी राहणार बंद
Next articleमहसूल दिन 1 ऑगस्ट रोजी होणार साजरा ; नांदेड तालुक्यात महसूल सप्ताहात विविध कार्यक्रमाचे आयोजन.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.