Home गडचिरोली राज्य सहकारी संघ मर्या.पुणे नागपूर विभागातून प्रमोदजी पिपरे यांची संचालक पदी निवड।

राज्य सहकारी संघ मर्या.पुणे नागपूर विभागातून प्रमोदजी पिपरे यांची संचालक पदी निवड।

185

आशाताई बच्छाव

1001764822.jpg

राज्य सहकारी संघ मर्या.पुणे नागपूर विभागातून प्रमोदजी पिपरे यांची संचालक पदी निवड।

गडचिरोली, सुरज गुंडमवार ब्युरो चीफ: राज्य सहकारी संघाच्या नागपूर विभागीय मतदार संघातून जिल्हा सहकार बोर्ड प्रतिनिधींच्या निवडणुकीत गडचिरोलीचे माजी नगरसेवक तथा भाजपचे जिल्हा महामंत्री प्रमोद पिपरे यांनी विजय संपादन केला आहे.

मतदारांशी असलेला दांडगा जनसंपर्क व पक्षातील नेतृत्वाच्या बळावर त्यांनी ही निवडणूक लढवली होती. जिल्हा सहकार बोर्डाच्या नागपूर विभागात ते प्रथमच निवडणुकीच्या मैदानात उतरले होते. भाजपमधील जेष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनात ही चुरशीची निवडणूक त्यांनी यशस्वीपणे लढून विजय संपादन केला.

पिपरे यांचे प्रतिनिधित्व महाराष्ट्र राज्य सहकारी संघाला पुढे नेण्यासाठी मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. त्यांच्या विजयासाठी भाजपमधील ज्येष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनात सहकार चळवळीत सक्रिय असलेले इंजि.प्रा.सुभाष आकरे, भाजपचे गोंदिया जिल्ह्यातील कार्यकर्ते यशवंत मानकर, खुमेंद्र कटरे यांनी परिश्रम घेतले.

या निवडणुकीत त्यांच्या विजयासाठी प्रयत्न करणारे माजी खासदार अशोक नेते, ज्येष्ठ सहकार नेते अरविंद सावकार पोरेड्डीवार, माजी आमदार डॉ.देवराव होळी, आ.डॉ.मिलिंद नरोटे, भाजपचे जिल्हा अध्यक्ष प्रा.रमेश बारसागडे, जिल्हा महामंत्री योगिता पिपंरे, भाजपचे ज्येष्ठ नेते बाबुराव कोहळे, जिल्हा सहकारी बोर्डचे अध्यक्ष वसंतराव मेश्राम यांनी त्यांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.

Previous articleमहाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्यादित पुणे राज्यस्तरीय निवडणूकित नागपूर विभागातून प्रमोद पिंपरे विजयी
Next articleटी व्ही स्टार डॉ.सुदाम महाराज पानेगांवकर यांना समाजरत्न पुरस्कार जाहीर
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.