आशाताई बच्छाव
मोठी आई बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने दहावीच्या व बारावीच्या विद्यार्थ्यांचा व विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार सोहळा संपन्न.
मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार
देगलूर -मोठी आई बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने दहावी- बारावी पास गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांचा उल्लेखनीय कार्य केल्या बद्दल सत्कार करण्यात आला. मोठी आई बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने अनेक सामाजिक उपक्रम राबवत असताना देगलूर शहरातील यावर्षी दहावी-बारावी पास गुणवंताचा सत्कार सोहळा नागार्जुन बुद्ध विहार येथे विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला. यावेळी चंद्रकांत ठाणेकर यांना महाराष्ट्र शासनाकडून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या. गुणवंत विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन करण्यासाठी डॉ. पुजा गायकवाड प्रा. भीमराव माळगे, आयटीआयचे शिक्षक प्रकाश सोनवणे, ॲड. प्रकाश ठाणेकर, ॲड. रुखसान्बी रज्जाक यांची प्रमुख उपस्थिती होती. दहावी- बारावीनंतर विविध अभ्यासक्रमास प्रवेश करून चांगला अभ्यास केला तर डॉक्टर, इंजिनीयर,प्राध्यापक,जिल्हाधिकारी,वकील,पोलीस अधिकारी,शिक्षक, उद्योजक होण्यासाठी पालक आणि विद्यार्थ्यांना सविस्तर असे मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे सचिव पत्रकार विनय कांबळे यांनी केले.
यावेळी विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.






