Home पुणे शिंदे गटांच्या पदाधिकाऱ्याकडून तरुणाला जबर मारहाण, काळंनिळं होईपर्यंत मारलं!

शिंदे गटांच्या पदाधिकाऱ्याकडून तरुणाला जबर मारहाण, काळंनिळं होईपर्यंत मारलं!

85
0

आशाताई बच्छाव

1001752762.jpg

शिंदे गटांच्या पदाधिकाऱ्याकडून तरुणाला जबर मारहाण, काळंनिळं होईपर्यंत मारलं!

पुणे प्रतिनिधी : शिवसेना शिंदे गटाच्या युवासेनेच्या पदाधिकाऱ्याने आणि त्याच्या साथीदारांनी पार्टीत गाणं लावण्याच्या वादातून युवकावर प्राण घातक हल्ला केला असल्याची माहिती समोर आली आहे. त्या युवकाला त्यांनी जबर मारहाण केली असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, करण जाधव असं त्या युवकाचे नाव आहे. त्याला शिंदे गटाच्या साथीदारांनी हातोडा, हॉकी स्टिक आणि लाकडी दांडक्याने जबर मारहाण केली. या घटनेत करण जाधव गंभीर जखमी असून त्याच्यावर कल्याणमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी टिटवाळा पोलीस ठाण्यात विकी भुल्लर, हैप्पी भुल्लर, सनी भुल्लर, मुकेश यादव, सचिन शेवाळे, मणि अण्णा, रमु आणि डॅनी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गटारी अमावस्येच्यानिमित्त करण जाधव आपल्या मित्रांसह आदित्य फार्महाऊसवर पार्टीसाठी गेला होता. रात्रीच्या सुमारास गाणं लावण्यावरून करण आणि दुसऱ्या गटात वाद झाला. वाद बघून फार्महाऊस मालकाने दोन्ही गटांना बाहेर जाण्यास सांगितले. याच दरम्यान उल्हासनगरातील शिंदे गटाचा युवा सेना पदाधिकारी विकी भुल्लर आपल्या साथिदारांसह फार्महाऊसवर दाखल झाला. त्यांच्या शाब्दिक वाद झाल्यानंतर त्यांच्या सहकाऱ्यांनी करणला जबर मारहाण केली.. या प्रकरणी पोलिसांनी विविध कलमांखाली गुन्हा नोंदवला असला तरी, घटनेनंतर 48 तास उलटून गेले तरीही एकाही आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आलेले नाही.जखमी करण जाधवने पोलिसांवर राजकीय दबावाखाली काम करत असल्याचा आरोप केला आहे. सध्या पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू आहे.

Previous articleखडसेंच्या जावयाबाबत पुणे पोलिसांनी केला धक्कादायक खुलासा, कोर्टात नेमकं घडलं काय?
Next articleपुण्याची वाहतूक कोंडी फुटणार, लवकरच होणार नवा रेल्वे मार्ग, इथं 250 एकरांवर मेगा टर्मिनल!
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here