Home अमरावती प्रेम संबंधातून महिलेचा खून आरोपी काही तासात जराबंदी स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

प्रेम संबंधातून महिलेचा खून आरोपी काही तासात जराबंदी स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

48
0

आशाताई बच्छाव

1001701758.jpg

प्रेम संबंधातून महिलेचा खून आरोपी काही तासात जराबंदी स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. दैनिक युवा मराठा. पी एन देशमुख अमरावती जिल्हा प्रतिनिधी. अमरावती. ( शिरजगाव कसबा ) अमरावती जिल्ह्यातील ब्राह्मणवाडा ते शिरसगाव रोडवरील बगाडीच्या नाल्यात उजलेले स्थितीत एका महिलेच्या मृतदेह ओळख पाठविण्यासहमारे त्याला अटक करण्यात गुन्हे शाखेला यश मिळाले. अनिल ईनकराम जांभेकर वय ३५रा. गळके औरंगपुरा तालुका अचलपूर जिल्हा अमरावती असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्या महिलेसोबत जांभेकर चे प्रेम संबंध होते. त्या संबंधातून ती वारंवार जांभेकर ला पैसे मागायची. त्या मागणीला त्याला कंटाळून त्याने तिच्या गळा आवरून खून केल्याची कबुली त्याने स्वतः दिली. त्या मृत महिलेचे दुर्गा विशाल श्रुती वय 27 असे मृत महिलांचे नाव आहे. शिरसगाव कसबा पोलिसाच्या हद्दीतील बगाडीच्या नाल्यात एका महिलेची पुजलेले प्रेत असल्याचे १0 जुलै रोजी दुपारी उघड झाले होते. ही माहिती मिळतात ये एस पी पंकज कुमावत, साहेब पोलीस अधीक्षक शुभम कुमार, स्थानिक गुन्हे शाखाप्रमुख किरण वानखडे यांच्यासह ठाणेदार महेंद्र गवळी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली होती. तो मृतदेह ब्लॅंकेटमध्ये हातपाय बांधलेल्या स्थितीत आढळून आला होता. गळा आवडल्याच्या खुणाही आढळल्याने उशिरा रात्री अज्ञात आरोपी विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सोबतच मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी पोलीस कामाला लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here