आशाताई बच्छाव
श्री.यादवराव सावंत यांना भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम राष्ट्रीय गौरव पुरस्कार -२०२५ जाहीर
विरदेल प्रतिनिधी -राकेश बेहेरे पाटील
शिंदखेडा तालुक्यातील नव्हे तर धुळे जिल्ह्यात पत्रकारिता व साहित्य क्षेत्रात नावलौकिक असलेले, आगळावेगळा ठसा उमटविणारे शिंदखेडा येथील जेष्ठ पत्रकार यादवराव सावंत यांना पुणे येथे ए. डी. फाउंडेशन च्या वतीने भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम राष्ट्रीय गौरव पुरस्कार -2025 (आदर्श पत्रकार) नुकताच जाहीर झाल्याचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अशोकजी गोरड यांनी यांनी पत्रान्वये कळविले असुन सदर पुरस्कार पुणे येथे 26 जुलै ला सिनेस्टार कलावंत, साहित्य क्षेत्रातील नामवंत तसेच आमंत्रित प्रमुखांच्या उपस्थितीत शानदार कार्यक्रमात प्रदान करण्यात येणार आहे.
शिंदखेडा येथील जेष्ठ पत्रकार यादवराव सावंत हे गेल्या तीस वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात सेवा देत असताना अनेक सडेतोड वृत्तांकन करत आपला समाजोपयोगी आगळावेगळा ठसा उमटविला आहे. संघर्षातून आपल्या कार्यात झोकुन देत आपल्या लेखणीतून समान न्याय देण्यात ते अग्रेसर आहेत. म्हणून शिंदखेडा तालुक्यात नव्हे तर धुळे जिल्ह्यात पत्रकारिता क्षेत्रात नाव आवर्जून घेतले जाते. पत्रकारिता क्षेत्राबरोबरच साहित्य क्षेत्रातील कविता, नाट्यलेखन, एकांकिका, विविध विषयावर लेख आदी क्षेत्रातील भरीव कामगिरी राहीली आहे. अत्याचार हे तीन अंकी नाटकाचे प्रकाशन पुणे येथील अखिल भारतीय साहित्य संमेलनात माजी शिक्षण मंत्री सुधीर जोशी यांच्या हस्ते गेल्या वीस वर्षापुर्वी झालेले असुन सदर नाटकाचे गोवा, गुजरात, महाराष्ट्रासह खान्देशात अनेक ठिकाणी नाट्यमंडळानी प्रयोग सादर केलेले आहेत. शालेय स्तरावर जिवंत विषयावर एकांकिका लेखन करून विविध सास्कृतिक कार्यक्रमात सादर होत असतात. सदर नाटकाने मृत्युंजय कार कै. शिवाजी सावंत राज्यपुरस्कार, कवी जगदीश खेबुडकर पुरस्कार, आकाशवाणी मुंबई तर्फ उत्कृष्ट लेखन पुरस्कार, अखिल भारतीय साहित्य संमेलनात लेखन पुरस्कार प्राप्त झाले आहेत. अष्टपैलू लेखणीतून व पत्रकारिता क्षेत्रात आतापर्यंत 149 लहान, मोठे जिल्हा, राज्य, राष्ट्रीय स्तरावरून प्रदान झाले असुन नुकताच जाहीर झालेला पुणे येथे होणारा भारतरत्न एपीजे अब्दुल कलाम राष्ट्रीय गौरव पुरस्कार हा 150 वा असुन सर्वोत्तम पुरस्कार आजपर्यंत चा असल्याचा त्यांना बहाल केला जाणार आहे. सदरचा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल शिंदखेडा येथील साधे भोळे व्यक्तिमत्व असलेले श्री.यादवराव सावंत यांचे शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, नातलग, मित्र परिवारासह सर्वत्र स्तरावरून अभिनंदन व शुभेच्छा दिल्या जात आहेत. व त्याच बरोबर दैनिक मराठा न्यूज नेटवर्क कडून सरांना खूप खूप शुभेच्छा..






