Home नाशिक इगतपुरी तालुक्यात पावसाचा हाहाकार ! ; सर्वत्र जलमय पुरस्थिती; अस्वली स्टेशन- मुंढेगाव-घोटी...

इगतपुरी तालुक्यात पावसाचा हाहाकार ! ; सर्वत्र जलमय पुरस्थिती; अस्वली स्टेशन- मुंढेगाव-घोटी चा संपर्क तुटला,दारणा, मुकणे, भावली,भाम,वाकी धरणांतून मोठा विसर्ग

151

आशाताई बच्छाव

1001676290.jpg

इगतपुरी तालुक्यात पावसाचा हाहाकार ! ; सर्वत्र जलमय पुरस्थिती; अस्वली स्टेशन- मुंढेगाव-घोटी चा संपर्क तुटला,दारणा, मुकणे, भावली,भाम,वाकी धरणांतून मोठा विसर्ग

नाशिक प्रतिनिधी मुकुंदा चित्ते

सकाळी सहा वाजे पर्यंत गत चोवीस तासांत 110 मिमी तर सायंकाळी सहा पर्यंत बारा तासांत जवळपास विक्रमी150 मिमी पाऊस पडला आहे. आज सायंकाळ पर्यंत एकूण 1 हजार700 मिमी पाऊस पडला आहे. यंदा सरासरीच्या दीड पट अधिक पाऊस पड़त असल्याने शेती पिकांची मोठी हानी झाली आहे. तालुक्यातील सर्वच धरणे, पाझर तलाव भरले असून मोठा विसर्ग सुरु आहे. भाताच्या लागवडी पावसामुळे संत गतीने सुरु असून काही शेतकऱ्यांच्या भाताच्या रोपांची पुरती वाट लागली असल्याने त्यांना पुन्हा चिखलावर मोडवलेले बियाने टाकावे लागत आहे.शेतामध्ये पुर पाणी येत असल्याने बांध फुटून शेत खच्चराचे नुकसान होत आहे. इगतपुरी तालुक्यात सर्वत्र जलमय स्थिती झाल्याने शासनाने तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तुकाराम वारघडे, राष्ट्रवादीचे युवक तालुका अध्यक्ष हरीष चव्हाण यांनी केली आहे.
अस्वली स्टेशन-घोटी संपर्क तुटला
दरम्यान घोटी-मुंढेगाव-अस्वली स्टेशन-भगुर राज्य मार्गावरिल अस्वली स्टेशन येथील पुलावर पाणी आल्याने हा राज्य मार्ग बंद झाला आहे. या ठिकाणी गेल्या चार वर्षांपासून सुरु असलेल्या पुलाचे काम बंद पडल्याने येथील स्थानिक विद्यार्थी,दुग्ध व्यावसायिक, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांचे खुप हाल होत आहे.
भाम,भावली,वाकी ओव्हरफ्लो
तालुक्यातील भावली आणि काळूस्ते येथील पंतप्रधान सिंचन योजनेतून बाँधलेले भाम धरण नुकतेच पूर्ण क्षमतेने भरले आहे .सायंकाळी सहा वाजता वाकी धरण देखील शंभर टक्के भरले. विशेष म्हणजे गेल्या पाच वर्षांत जुलैच्या पहिल्या आठवड्यातच तालुक्याची तीन धरणे पहिल्यांदा भरली.
दारणा 70 टक्के,कड़वा 65 टक्के,मुकणे 75 टक्के अशी आकडेवारी असल्याने ही धरणे देखील भरण्याच्या मार्गावर आहेत.

Previous articleमाहोरा येथे शुक्रवार बाजार दिवशी चोऱ्यांना आळा घालण्यासाठी बंदोबस्त
Next articleश्री.यादवराव सावंत यांना भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम राष्ट्रीय गौरव पुरस्कार -२०२५ जाहीर
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.