आशाताई बच्छाव
तळ्यात बुडून तरुण युवकाचा मृत्यू
नांदेड :- प्रतिनिधी शिवाजी धुमाळे
दि. 29 जुन रोजी नांदेड पासून जवळच असलेल्या डेरला येथील तरुण शंकर बाबाराव शिंदे वय वर्ष 34 याचा गावातील तळ्यात मृतदेह आढळून आला सदरील व्यक्ती हा गेली सात ते आठ दिवसापासून बेपत्ता होता गावालगत असणाऱ्या तळ्या जवळ गावातीलच एक लहान मुलगा आपली जनावरे चारत होता त्या मुलाची जनावरे तळ्याशेजारी गेल्याने तो तिथे गेला असता त्याच्या निदर्शनास आल्याने त्याने जवळच असलेल्या व्यक्तींना ही बाब लक्षात आणून दिली मृत व्यक्ती हा फुगलेल्या अवस्थेत आढळून आला गावातील पोलीस पाटील व सरपंच व नातेवाईक तसेच गावातील नागरिक यांच्या पुढाकाराने मृत शव तळ्याबाहेर काढून अंत्यसंस्कार करण्यात आले मृत व्यक्तीच्या पश्चात आई वडील, भाऊ, भावजय, बायको,एक मुलगा व मुलगी असा परिवार आहे






