Home नाशिक पंढरपूर येथे ७ जुलै रोजी वारकरी पुरस्कार वितरण यंदाचे मानाचे व सन्मानाचे...

पंढरपूर येथे ७ जुलै रोजी वारकरी पुरस्कार वितरण यंदाचे मानाचे व सन्मानाचे वारकरी पुरस्कार जाहीर

150

आशाताई बच्छाव

1001641308.jpg

पंढरपूर येथे ७ जुलै रोजी वारकरी पुरस्कार वितरण

यंदाचे मानाचे व सन्मानाचे वारकरी पुरस्कार जाहीर

आचार्य लहवितकर ट्रस्टचे अध्यक्ष हभप गंगाधर कारभारी जाधव यांची माहिती

दैनिक युवा मराठा
निफाड नाशिक रामभाऊ आवारे तालुका प्रतिनिधी

हभप आचार्य रामकृष्ण महाराज लहवितकर ट्रस्ट व देहूकर महाराज फड यांचे वारकरी पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे अशी माहिती अध्यक्ष गंगाधर कारभारी जाधव यांनी दिली आहे.
हभप आचार्य रामकृष्ण महाराज लहवितकर ट्रस्ट व देहूकर महाराज फड यांच्याद्वारे प्रतिवर्षी महाराष्ट्रातील अतिशय गौरवशाली व सेवाभावी व्यक्तींचा वै.सद्‌गुरु सोपानकाका महाराज देहूकर यांच्या पुण्यस्मरणार्थ वारकरी पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो. २०२५ चे वारकरी पुरस्कार नुकतेच जाहीर झाले असून सोमवारी ७ जुलै रोजी श्री देहूकर वाडा, कुंभार घाट, पंढरपूर येथे पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आचार्य रामकृष्ण महाराज लहवितकर ट्रस्टचे अध्यक्ष हभप गंगाधर कारभारी जाधव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. या पुरस्कारात सद्गुरु वै. हभप सोपानकाका महाराज देहूकर वारकरी पुरस्कार, सांप्रदायिक मृदंग वादक सेवा पुरस्कार, सांप्रदायिक वारकरी भजन सेवा पुरस्कार, देहकर महाराज फड सेवा पुरस्कार या पुरस्कारांचे वितरण देहूकर महाराज फड तथा पंढरपूरचे जेष्ठ अधिकारी हभप श्रीगुरु बाळासाहेब महाराज देहूकर यांच्या शुभहस्ते होणार आहे. श्री विठ्ठल रुख्मिनी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, चैतन्य महाराज देगलूरकर पंढरपुर, संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथजी महाराज उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संतवीर बंडा तात्या महाराज कराडकर, द्वाराचार्य डॉ. रामकृष्णदास महाराज लहवितकर, संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष जालिंदर महाराज मोरे, प्रमोद महाराज जगताप (बारामती) राहणार आहेत. कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून देहूकर महाराज फड जेष्ठ अधिकारी श्रीगुरु बापूसाहेब महाराज देहूकर, संत निवृत्ती महाराज संस्थान त्र्यंबकेश्वर अध्यक्ष अँड. सोमनाथ ज्ञानेश्वर घोटेकर, संत मुक्ताई संस्थानचे अध्यक्ष अँड. रविंद्र पाटील उपस्थित राहणार आहेत. या भव्य पुरस्कार सोहळ्यासाठी वारकरी संप्रदायाचे श्रद्धेने कार्य करणाऱ्या सर्व संघटनांचे पदाधिकारी, फड प्रमुख, दिंडी प्रमुख, महाराज मंडळी उपस्थित राहणार असल्याचे कळवण्यात आले आहे.
*यंदाच्या पुरस्काराचे मानकरी याप्रमाणे–*
सद्गुरु वै. हभप सोपानकाका महाराज देहूकर वारकरी पुरस्कार हभप गुरुवर्य संदिपन महाराज शिंदे हासेगावकर अध्यक्ष सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची यांना जाहीर झाला असून ५१ हजार निधी, पोषाख, महावस्त्र, सन्मान चिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. सांप्रदायिक मृदंग वादक सेवा पुरस्कार मृदंग अलंकार गंभीर महाराज अवचार (आळंदी देवाची) सांप्रदायिक वारकरी भजन सेवा पुरस्कार हभप संगीत अलंकार राधाकृष्ण महाराज गरड, गुरुजी (वांगी संस्थान), श्री देहकर महाराज फड सेवा पुरस्कार हभप ज्ञानोबा सदाशीव ढोक यांना पुरस्कार जाहीर झाले असून या पुरस्काराचा निधी रुपये २५ हजार, पोषाख. महावस्त्र, सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

Previous articleमहाबोधी महाविहार मुक्त करा व दीक्षाभूमी सौंदर्यकरण तात्काळ सुरू करा
Next articleशिंदखेड्यात छत्रपती शिवाजी चौक ते भगवा चौका पर्यंत स्त्याची दुरावस्था
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.