आशाताई बच्छाव
विना परवाना गतिरोधक काढण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना
अहिल्यानगर प्रतिनिधी कारभारी गव्हाणे –जिल्ह्यात महामार्गावर, तसेच इतर मार्गावर अनेक ठिकाणी विनापरवानगी गतीरोधक उभारण्यात आले आहेत. या गतिरोधकांमुळे अनेकवेळा अपघात घडतात. त्यामुळे विनापरवानगी उभारण्यात आलेले गतिरोधक काढण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिल्या आहेत.
ज्या ठिकाणी आवश्यकता असेल त्याच ठिकाणचे गतिरोधक ठेवण्यात यावेत. गतिरोधकाच्या ठिकाणी रिफ्लेक्टर, बोर्ड आदी बसविण्यात यावेत, असे ते म्हणाले. रस्त्यावरील दिशादर्शक फलकावर कुठल्याही प्रकारच्या राजकीय जाहिराती, शुभेच्छा संदेश दिसणार नाहीत याची दक्षता घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी आशिया यांनी यावेळी दिल्या आहेत. तसेच वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या खासगी वाहनांवर कारवाई करावी. तसेच जिल्ह्यातील बंद टोलनाके काढून टाकण्याच्या सूचना त्यांनी संबंधित प्रशासनाला दिल्या.