Home उतर महाराष्ट्र पंढरपूर यात्रेसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांच्या दिंडीच्या मुक्कामस्थळी तीन महागडे मोबाईल गेले चोरीला…अन् श्रीरामपूर...

पंढरपूर यात्रेसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांच्या दिंडीच्या मुक्कामस्थळी तीन महागडे मोबाईल गेले चोरीला…अन् श्रीरामपूर पोलिसांनी दोन तासात चोराला घेतले ताब्यात!

240

आशाताई बच्छाव

1001625838.jpg

पंढरपूर यात्रेसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांच्या दिंडीच्या मुक्कामस्थळी तीन महागडे मोबाईल गेले चोरीला…अन् श्रीरामपूर पोलिसांनी दोन तासात चोराला घेतले ताब्यात!

श्रीरामपूर दिपक कदम युवा मराठा न्यूज आँनलाईन -नुकतेच. सुमारास सरला बेट धाम दिंडीतील वारकरी हे आरामाकरीता स्वयंवर मंगल कार्यालय श्रीरामपूर येथे थांबलेले असतांना कोणीतरी अज्ञात इसमाने चार्जिगला लावलेले तीन मोबाईल चोरुन नेले होते परंतु श्रीरामपूर पोलीस ठाण्याच्या कर्तव्यदक्ष पोलिसांनी या मोबाईलचा दोन तासाच्या आत शोध लावला असून वारकऱ्यांकडे सुपुर्त केले आहे.

सदर घटनेबाबत पोलिस निरीक्षक नितीन देशमुख यांना माहिती मिळताच त्यांनी तपास पथकास वारकाऱ्यांचे चोरी गेलेले मोबाईल व सदरचा अज्ञात चोरट्याचा शोध घेण्याचे आदेश दिल्याने तपास पथकांने तात्काळ सदर ठिकाणी जावुन घटनास्थळाची पाहणी व तांत्रिक विश्लेषण केले असता सदरचा गुन्हा हा सराईत आरोपी नामे १) किरण जगन्नाथ चिकणे, रा. वॉर्ड नं.६,श्रीरामपूर याने केल्याचे निष्पण झाल्याने सदर आरोपीताचा त्याचे राहते घरी शोध घेतला असता तो मिळून आल्याने त्याच्याकडुन वारकऱ्याचे तीन मोबाईल जप्त करण्यात आले.

महागड्या किंमतीचे मोबाईल दोन तासाच्या आत जप्त करण्यात आले असुन आरोपीतास तात्काळ ताब्यात घेण्यात आले असुन पुढील कारवाई करत आहोत.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर वैभव कलुबर्मे तसेच मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपूर विभाग श्रीरामपूर, डॉ. बसवराज शिवपुजे यांचे मार्गदर्शनाखाली मा. पोलीस निरीक्षक, श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे, नितीन देशमुख, यांचेकडील तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके, पोलिस हेड कॉन्स्टेबल अमोल गायकवाड, पो. हेड कॉन्स्टेबल अमोल पडोळे, मच्छिंद्र कातखडे,संभाजी खरात, अजित पटारे,आजिनाथ आंधळे,सांगर बनसोडे, रामेश्वर तारडे, यांनी केली असुन पुढील कायदेशीर कारवाई श्रीरामपूर शहर पोलीस करीत आहेत.

Previous articleप्रबोधनकार संघटनेच्या वतीने साकोली येथे रक्तदान शिबीर २६ रोजी राजर्षी शाहू महाराज जयंतीचे औचित्य
Next articleराष्ट्रीय चर्मकार महासंघ शाखा पवनीच्या वतीने तहसीलदार सोनवणे पवनी यांना निवेदन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.