Home गडचिरोली आमदार मिलिंद नरोटे यांनी स्वखर्चाने वाचनालयाची छत दुरुस्त करून विद्यार्थ्यांसाठी दिला मोठा...

आमदार मिलिंद नरोटे यांनी स्वखर्चाने वाचनालयाची छत दुरुस्त करून विद्यार्थ्यांसाठी दिला मोठा दिलासा

194

आशाताई बच्छाव

1001613338.jpg

आमदार मिलिंद नरोटे यांनी स्वखर्चाने वाचनालयाची छत दुरुस्त करून विद्यार्थ्यांसाठी दिला मोठा दिलासा

चातगाव/गडचिरोली सुरज गुंडमवार ब्युरो चीफ:- आमदार मिलिंद नरोटे दिनांक 16 जून सोमवारला चातगाव येथील विद्यार्थ्यांच्या वाचनालयाला भेट दिली होती.
पावसाळ्याच्या दिवसात वाचनालयाच्या छतामधून पावसाचे पाणी गळत असल्याने विद्यार्थ्यांना अभ्यास करताना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. ही समस्या लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी आमदार मा. मिलिंद नरोटे यांच्याकडे छत दुरुस्ती ची मागणी केली होती.

विद्यार्थ्यांची ही व्यथा गांभीर्याने घेत, मा. आमदार मिलिंद नरोटे यांनी कोणताही औपचारिक निधी न घेता स्वखर्चातून दुसऱ्याच दिवशी नवीन टिन पत्रे लाऊन वाचनालयाची छत दुरुस्त करून दिली. या उपक्रमामुळे आता विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि शांत वातावरणात अभ्यास करता येणार आहे.

ग्रामस्थ व विद्यार्थ्यांनी आमदार साहेबांचे मनःपूर्वक आभार मानले असून, त्यांच्या या विधायक कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Previous articleअमरावती येथे २४ ऑगस्ट रोजी राज्यस्तरीय समाज क्रांती पुरस्कार वितरण सोहळा
Next articleप्रेमाला ना बंधन, ना भीती…पुण्यात पार पडला पहिला समलैंगिक विवाहसोहळा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.