आशाताई बच्छाव
आई फाउंडेशनच्या सौ अर्चना वैद्य महाराष्ट्र औद्योगिक जनरल कामगार सुरक्षा रक्षक युनियन महिला संपर्कप्रमुख पदी
दैनिक युवा मराठा
निफाड नाशिक प्रतिनिधी रामभाऊ आवारे
पुणे चिंचवड येथील आई फाउंडेशन संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष सौ अर्चना सुरेश वैद्य यांची महाराष्ट्र प्रदेश महिला संपर्कप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे अशी माहिती महाराष्ट्र औद्योगिक जनरल कामगार सुरक्षा रक्षक यांची अध्यक्ष सुरेश आण्णा गायकवाड यांनी दिली आहे.
महाराष्ट्र औद्योगिक जनरल कामगार सुरक्षा रक्षक युनियनचे अध्यक्ष आयुष्यमान श्री सुरेश (आण्णा) गायकवाड महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष व आयुष्यमान श्री सयाजीराव पाटील महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस यांच्या हस्ते सौ अर्चना सुरेश वैद्य यांची महाराष्ट्र प्रदेश महिला संपर्क प्रमुख पदी नियुक्तीपत्र देण्यात आले आहे. नियुक्ती करण्याचे स्वरूप प्रमाणपत्र, शाल ,श्रीफळ ,पुष्पगुच्छ मान्यवरांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले. त्याप्रसंगी जनरल कामगार युनियनचे पदाधिकारी पुरुष व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. विचाराभिमुख सामाजिक कार्याची श्री सयाजीराव पाटील यांच्या विचारांशी सहमत राहुन जनसामान्य पर्यंत पोहोचवून संघटनेचे कार्य वाढीसाठी सोपवली महत्त्वपूर्ण जबाबदारी व संघटना बळकट करण्याची जबाबदारी सौ अर्चना वैद्य यांच्याकडे दिली असून त्या आपल्या कार्याची पावती मोठ्या शिफारशीने पार पाडतील अशी महाराष्ट्र औद्योगिक जनरल कामगार सुरक्षा रक्षक युनियनची सलग्न राहून पार पडतील अशी आशा संघटनेच्या वतीने अपेक्षा व्यक्त केली आहे.