आशाताई बच्छाव
किसनराव (तात्या) सानप- सोनेवाडी येथील सानप कुटुंबियांचा आधारवड
आदर्शवत राजकीय व समाजकार्य करणारे अफलातून व्यक्तीमत्व
दैनिक युवा मराठा
निफाड (नाशिक) तालुका रामभाऊ आवारे
समाज जीवन जगत असताना अनेक व्यक्तींचा आदर्श आपण डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करत असतो परंतु ती वाटचाल करत असताना काही व्यक्ती स्मरणातच नव्हे तर त्यांचे आदर्श विचार आपल्याच रुजवणे काळाची गरज आहे. सोनेवाडी तालुका निफाड येथील एक आदर्श व्यक्तिमत्त्व म्हणून ज्यांचं खऱ्या अर्थाने नाव घेणे गरजेचे आहे ते ज्येष्ठ राजकीय व सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेले किसनराव भाऊराव पाटील सानप.
आज या ज्येष्ठ व्यक्तिमत्त्वाचा ८५ वा वाढदिवस साजरा करताना कुटुंबियांना होत असलेला आनंद द्विगुणीत करणारा असून आदरणीय तात्यांवर प्रेम करणारे सर्व आप्तेष्ट, सगेसोयरे, नातेवाईक, ज्ञात अज्ञात सर्व हितचिंतक यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. एक सर्वांबरोबर मनोमिलनाचा व सुसंवाद साधण्याचा योग निफाड – नाशिक रोड वरील उपासना लॉन्स निफाड येथे सानप कुटुंबियांनी घडवून आणला आहे.
किसन भाऊराव पाटील सानप उर्फ तात्या सोनेवाडी खुर्द तालुका निफाड यांचा जन्म एक जून 1940 रोजी गुळवंच तालुका सिन्नर येथे आजोळी झाला. मामाचे गाव सिन्नर तालुक्यातील दातली येथील असून दगडू नाना भाबड हे तात्यांचे मामा.
वडील भाऊराव पाटील सानप यांच्याकडे वडिलोपार्जित श्रीमंती व जमीनदारी होती. भाऊराव म्हसु पाटील यांना 300 एकर जमीन. यांना तीन पुत्ररत्न पैकी सर्वात मोठे स्वर्गीय कारभारी पाटील ,नंबर दोन स्वर्गीय छबूराव पाटील आणि तृतीय क्रमांक असलेले किसनराव तात्या सानप. घरची श्रीमंती असल्याने किसनराव पाटील यांचा श्रीमंत घराण्यात जन्म झाला. प्राथमिक शिक्षणाचे धडे शिवडी व सोनेवाडी या ठिकाणी घेत त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले होते. त्यानंतर माध्यमिक शिक्षणासाठी निफाड येथे दाखल केल्यानंतर शिक्षण करत असतानाच पुणे येथील किर्लोस्कर कंपनीत किसनराव सानप यांना नोकरी लागली होती. दरम्यानच्या काळात पानशेत धरण फुटल्याने शेती करण्यासाठी कोणी नसल्याने त्यांना नोकरी सोडून घरी यावं लागलं होतं शेती व्यवसायाचा मोठा गाडा असल्याने किसनराव सानप यांनी स्वतःला शेतीमध्ये झोकून देत शेती सांभाळण्यासाठी सुरुवात केली घरची आमदनी भरपूर असल्याने १२ बैल ,३० ते ४० गाई ,दोन ट्रॅक्टर, दोन घोडे असा हा लवाजमा होता. बारा बैलाची शेती करणारे निफाड तालुक्यातील कदाचित हे एकमेव धन दांडगे कुटुंब असेल याबद्दल शंका नसावी. किसन पाटील सानप यांना सहा बहिणी व दोन भाऊ असल्याने व घरची श्रीमंती असल्याने अत्यंत राजेशाही थाटामध्ये त्यांनी आपले जीवन जगले होते. शिवडी ,सोनेवाडी ,नैताळे, थेटाळे, उगाव परिसरामध्ये त्यांच्या नावाचा दबदबा असल्याने सर्वच लोक त्यांच्याकडे आपुलकीने व एक आदर्श व नेतृत्व करणारे व्यक्तिमत्त्व म्हणून बघत असल्याने किसन पाटील सानप यांनी आपल्या शांत संयमी व नेतृत्व गुणाच्या बळावर सोनेवाडी खुर्द सोनेवाडी बुद्रुक व थेटाळे ग्रुप ग्रामपंचायत असलेल्या ग्रामपंचायतचे ते सरपंच म्हणून त्यांनी अनेक वर्ष आदर्श असा कारभार केला होता. दरम्यानच्या काळात पत्नी लक्ष्मीबाई यांची सदैव साथ लाभल्याने किसनराव पाटील सानप एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून परिसरात परिचित आहे . त्यानंतर शिवडी विकास संस्थेचे संचालक ते चेअरमन पदापर्यंत त्यांनी आपल्या राजकीय कार्यकालात धडक मारली होती त्यानंतर निफाड खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीमध्ये चांगल्या मतांनी निवडून येऊन संचालक पद भूषविले होते. त्या काळामध्ये राजकारण करायचे म्हटले की गावामध्ये एक वेगळाच धबधबा असायचा शब्दाला मान असायचा गोरगरिबांच्या लग्नकार्यामध्ये येणाऱ्या अडीअडचणी सोडविण्यासाठी सातत्याने पुढाकार घेऊन गोरगरिबांची लग्न घरातील त्यांचे शेतीवाडी ची वाटणी या सर्वांवर वचक असल्याने किसनराव पाटील सानप यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक लोकांना मदत करून आपला आदर्श निर्माण केला आहे.
किसनराव तात्या सानप यांना तीन मुली असून वडील मुलगा बाळासाहेब सानप व बाबुराव सानप हे दोघेही राजकारणात अग्रेसर असून चांगल्या पद्धतीची शेती करून परिसरामध्ये एक आदर्श शेतकरी म्हणून नावलौकिक मिळविला आहे शिवडी विकास संस्थेमध्ये दोघांनीही सत्तास्थानी हस्तगत केली असून उत्कृष्ट द्राक्ष बागायतदार म्हणून त्यांचे प्रामुख्याने नाव घेतले जाते. किसन तात्या सानप यांचे तृतीय चिरंजीव विलासराव उत्कृष्ट वास्तू विशारद आर्किटेक म्हणून नासिक येथे वास्तव्याला आहे. किसनराव सानप यांना बाळासाहेब, बाबुराव व विलास हे तीन मुले असून रंजना राजाराम कातकडे ओणे, सौ भारती चंद्रभान थोरे धारणगाव मरळगोई, स्नेहल राहुल कराड निफाड या तीन मुली आहेत. किसन पाटील सानप यांची एक कन्या स्नेहल ही स्वर्गीय प्रल्हाद पाटील कराड यांची नातसून असून गुण्यागोविंदाने हा सर्व परिवार आपले जीवन जगत आहे.
किसनराव (तात्या) सानप यांना पाच नातू, चार नाती, सहा पणतू असा एकंदरीत परिवार असून उतरत्या वयातही त्यांना अद्याप पावेतो चष्मा लागलेला नसून कोणत्याही प्रकारची औषधे त्यांना घ्यावी लागत नाही या वयातही ते स्वतः चार चाकी चालवणे, वाचन करणे, त्याचबरोबर ऊस, खारीक ,बदाम, खारका आजही ते खुराक करत आहे. म्हणजेच एकंदरीत निरोगी शरीर असलेले तात्या यांच्याकडे आजही बघितले तर त्यांचे 85 वय असेल असे कोणालाही वाटणार नाही पांढरे शुभ्र कपडे घातलेला पोशाख आज त्यांचा राहण्याचा बाणा आहे. अत्यंत नम्र, हुशार, संयमी असलेले तात्या आजही सर्व नातलगांना हवेहवेसे वाटतात कारण कोणाकडे जायचं म्हटलं तर ना आजारपण ना गोळ्यांचा त्रास ना कोणालाही सेवा करण्याची संधी ते उपलब्ध करून देत नसल्याने सर्व गोतावळ्यांना तात्यांनी आपल्याकडे यावं असं सारख वाटत असतं. आजही तात्या व बाई हे दोघेही लग्न कार्याला हजेरी लावून आपल्या नातलगांमध्ये मिसळून आहेत.साधारण 1985 साली भावांमधून विभक्त झाले आहे. तेव्हापासून मुलगा बाळासाहेब शेतीत मदत करू लागले. बाबुराव पाटील व विलास पाटील सानप यांच्या च्या साथीने त्यांनी शेतीचे कायापालट करून शेतीचे नंदनवन केले तात्यांचा त्यात सिंहाचा वाटा आहे पंचक्रोशीत व नातेवाईकांमध्ये ते तात्या नावाने ओळखले जातात तसेच त्यांनी द्राक्ष शेती, ऊस, कांदे, गहू विविध प्रकारचे पिके घेऊन आठ किमी पाईपलाईन करून शेती चांगल्या प्रकारे शेतीत नंदनवन करून आदर्श शेती कशी करावी याचे मूर्तीमंत उदाहरण असून आज या ज्येष्ठ मार्गदर्शक व सानप परिवाराच्या आधारस्तंभाचा वाढदिवस साजरा करताना सानप कुटुंबियांना विशेष आनंद होत आहे.
त्यांचं पुढील आयुष्य सुख ,समाधानाचे ,समृद्धीचे व भरभराटीचे जावो ही तमाम हितचिंतक व नातलगांच्या वतीने त्यांना शुभेच्छा—
करण बाळासाहेब सानप (नातु)
सोनेवाडी खुर्द तालुका निफाड नाशिक






