आशाताई बच्छाव
प्रतिनिधी सोलापूर ज्ञानेश्वर निकम- भारत पुननिर्माण मिशन राष्ट्रीय समिती यांच्या वतीने दरवर्षी देण्यात येणारा राष्ट्रीय स्तरावरचा समाजभूषण पुरस्कार देशात आणि राज्य स्तरावर समाज्यासाठी चांगले उत्कृष्ट कार्य करणारे व्यक्तींना देण्यात येत असतो सन 2025 यावर्षीचा समाजभूषण पुरस्कार देशातर्गत आणि राज्यस्तरावर उत्कृष्ट कार्य करणाऱ्या 21 व्यक्तीची निवड करण्यात आली आहे भारत पुननिर्माण मिशन राष्ट्रीय समिती चे राष्ट्रीय अध्यक्ष श्री नितीनराव माने यांनी महाराष्ट्रातील हळगाव ता.जामखेड चे सुपुत्र आणि श्रीगोंदा जि.अहिल्यानगर येथील ढवळे वधु वर सूचक चे संस्थापक अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते श्री सुभाष अर्जुन ढवळे यांच्या कार्याची दखल घेऊन अध्यक्ष श्री सुभाष अर्जुन ढवळे यांना राष्ट्रीय समाजभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे भारत पुननिर्माण मिशन राष्ट्रीय समिती चे सोलापूर जिल्हाध्यक्ष श्री सचिनराव गोडसे यांनी श्रीगोंदा येथील अध्यक्ष श्री सुभाष ढवळे यांना कळविले आहे ढवळे यांनी आजपर्यंत महाराष्ट्रासह गुजरात.मध्यप्रदेश.कर्नाटक या राज्यातही जे गरजवंत वधू वर आहेत या सर्व मुला मुलींना विश्वासात घेऊन सहकार्य केलेले आहे अध्यक्ष श्री सुभाष ढवळे यांनी आजपर्यंत सर्वधर्मीय मुला मुलींचे 1150 पेक्षा अधिक विवाह जमविले आहे या कार्याबद्दल भारत पुननिर्माण मिशन राष्ट्रीय समिती चे सोलापूर जिल्हाध्यक्ष श्री सचिन गोडसे यांनी सामाजिक कार्यकर्ते श्री सुभाष ढवळे यांना कळविले आहे हा पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम लवकरच पुणे येथे सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत एका मोठ्या कार्यक्रमात सुभाष ढवळे यांच्यासह सर्वांना प्रदान करण्यात येणार आहे राष्ट्रीय अध्यक्ष श्री नितीनराव माने आणि सोलापूर जिल्हाध्यक्ष श्री सचिनराव गोडसे आणि इतर मान्यवर यांच्या हस्ते सामाजिक कार्यकर्ते श्री सुभाष ढवळे यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे सुभाष ढवळे यांना समाजभूषण पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सुभाष ढवळे यांचे विधान परिषद चे सभापती श्री राम शिंदेसाहेब. माजी मंत्री बबनराव दादा पाचपुते श्रीगोंदा चे विद्यमान आमदार विक्रमसिंह पाचपुते मा.आमदार राहुल जगताप ज्येष्ठ नेते घनश्याम शेलार जामखेड भाजपा तालुका अध्यक्ष श्री बापूराव ढवळे भाजपचे जेष्ठ नेते श्री मधुकरआबा राळेभात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष दत्तात्रय वारे हळगाव ग्रामपंचायतीचे मा. उपसरपंच आणि अहिल्यादेवी पतसंस्था चेअरमन श्री आबासाहेब ढवळे रयत शेतकरी संघटना सातारा जिल्हाध्यक्ष श्री संजय लाड सांगली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला जिल्हा उपाध्यक्ष सौ. अनिताताई कदम मालेगाव जि. नाशिक सामाजिक कार्यकर्ते श्री श्री विश्वासराव शिंदे युवा मराठा न्युज पेपर चे संपादक श्री राजेंद्र राऊत साहेब यांच्यासह महाराष्ट्रातील अनेकांनी अभिनंदन केले आहे