Home नाशिक खडक माळेगाव येथे मामाच्या गावाला आलेल्या मुलाचा शेततळ्यात पडून मृत्यू

खडक माळेगाव येथे मामाच्या गावाला आलेल्या मुलाचा शेततळ्यात पडून मृत्यू

411

आशाताई बच्छाव

1001578086.jpg

खडक माळेगाव येथे मामाच्या गावाला आलेल्या मुलाचा शेततळ्यात पडून मृत्यू

दैनिक युवा मराठा
निफाड नाशिक प्रतिनिधी रामभाऊ आवारे

खडकमाळेगाव ता. निफाड येथे सुट्टीनिमित्त मामाच्या गावाला आलेल्या १० वर्षीय बालकाचा मृतदेह शेततळ्यात आढळल्याने परीसरात एकच खळबळ उडाली आहे.
कु.युवराज मंगेश कोकाटे वय १० वर्ष रा.एम.आय.डी.सी.सातपुर, नाशिक हा सुट्टीनिमित्त खडक माळेगांव येथे मामाच्या गावाला आला होता. मात्र तो दि.५ जून सायं ६ वाजेपासून गायब होता. याबाबत पो.पा.वैशाली बाजारे यांनी लासलगाव पोलीस स्टेशनला कळवले असता स.पो.नि.भास्करराव शिंदे यांनी फौजफाट्यासह खडक माळेगाव येथे दाखल होऊन परिसरात शोध घेत घेतला. शोधमोहीम सुरु असतांना दि.६ जून रोजी दुपारी २ वाजता दिंगबर गायकवाड यांना संजय वामन गवळी याचे मालकीची शेत गट नंबर १६ मधील पाण्याचे शेत तळ्यात त्याचा मृतदेह पालथ्या स्थितीत तरंगतांना मिळुन आला. याबाबत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून स.पो.नि.भास्करराव शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली पो.ऊ.नि.किसन पवार अधिक तपास करीत आहेत.

Previous articleग्यानबा तुकाराम.. आश्वासनातले किती झाले काम..? असे म्हणत जिल्हाप्रमुख भास्करराव आंबेकर यांनी विचारला सत्ताधार्‍यांना सवाल
Next articleजाहिर आभार व ऋणनिर्दश
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.