आशाताई बच्छाव
“युवा मराठा न्यूज”चे राजेंद्र पाटील राऊत यांना शिवहिंद समाजरत्न पुरस्कार प्रदान
जय शिवराय ग्रुपचा विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न…
(प्रविण क्षीरसागर प्रतिनिधी)
मालेगाव:- आज शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून मालेगाव शहरातल्या कँम्प भागातील जय शिवराय ग्रुपच्या वतीने विद्यार्थी गुणगौरव सोहळा व विविध क्षेत्रातील कार्य करणाऱ्या मान्यवरांना शिवहिंद समाजरत्न पुरस्कार २०२५ देऊन सन्मानित करण्यात आले.
जय शिवराय ग्रुपचा हा उपक्रम सन २०१५ पासून अखंडितपणे सुरू आहे.आज संपन्न झालेल्या या सोहळ्यात “युवा मराठा न्यूज”चे मुख्य संपादक, युवा मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष, आश्रयआशा फाऊंडेशन व-हाणे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र पाटील राऊत यांना त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत स्वबळावर स्वतः चे स्थान निर्माण करुन आपले जीवन समाजकार्यासाठी झोकून दिले.व अनेक प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी त्यांनी विविध आंदोलनातून संघर्ष उभा केला त्यामुळेच आज त्यांना शिवहिंद समाजरत्न पुरस्कार २०२५ त्यांच्या संघर्षात्मक कामगिरीची दखल घेऊन देण्यात आला.या निमित्त अनेकांनी राजेंद्र पाटील राऊत यांचे अभिनंदन केले आहे.






