Home उतर महाराष्ट्र राहुरी / गुहा : नगर मनमाड राज्य महामार्गावर भीषण अपघात! कंटेनर जळून...

राहुरी / गुहा : नगर मनमाड राज्य महामार्गावर भीषण अपघात! कंटेनर जळून खाक

237

आशाताई बच्छाव

1001547614.jpg

राहुरी / गुहा : नगर मनमाड राज्य महामार्गावर भीषण अपघात! कंटेनर जळून खाक
श्रीरामपूर दिपक कदम तालुका प्रतिनिधी –राहुरी तालुक्यातील गुहा परिसरात फ्रिज व AC यांचे पार्ट्स घेऊन मनमाडकडे जात असलेल्या भरधाव कंटेनरचा अचानक टायर फुटला. अनियंत्रित झालेला कंटेनर रस्त्याच्या बाजूला खोदून ठेवलेल्या खड्ड्यात गेल्याची घटना आज दिनांक 30 मे रोजी पहाटे घडली. यानंतर काही वेळाने अचानक आग लागली! डिझेल टाकी फुटल्याने आगीचा भडका उडाला आणि कंटेनरने पेट घेतला. यामध्ये चालक-वाहकाला गंभीर इजा झाली असून त्यांना पुढील उपचारासाठी राहुरी येथे हॉस्पीटल मध्ये पाठवण्यात आले. कंटेनरमधील लाखोरुपयांचे फ्रिज व AC यांचे गोदरेज कंपनीचे पार्ट्सची देखील राख झाली असून हा अपघात नगर मनमाड महामार्गवरील गुहा येथील पेट्रोल पंपासमोर पहाटेच्या सुमारास घडला. यावेळी सकाळपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या. आग लागल्यानंतर राहुरी नगरपरिषद तसेच देवळाली प्रवरा नगरपरिषद येथील अग्निशमन बबांना प्राचारन करण्यात आले. यावेळी त्यांनी शर्थीचे प्रयत्न केले.
यामध्ये कंटेनर चे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन राख रांगोळी झाली.

Previous articleस्वप्निल सोनार यांची श्रीरामपूर शहराध्यक्षपदी निवड : मनसेच्या संघटनात्मक बांधणीस नवे बळ
Next articleदेवळा तालुक्यात उडाली खळबळ,निंबोळा येथे भाऊसाहेब आहेर यांचा हरणी बंधा-याजवळ आढळला मृतदेह
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.