Home उतर महाराष्ट्र स्वप्निल सोनार यांची श्रीरामपूर शहराध्यक्षपदी निवड : मनसेच्या संघटनात्मक बांधणीस नवे बळ

स्वप्निल सोनार यांची श्रीरामपूर शहराध्यक्षपदी निवड : मनसेच्या संघटनात्मक बांधणीस नवे बळ

105
0

आशाताई बच्छाव

1001547599.jpg

स्वप्निल सोनार यांची श्रीरामपूर शहराध्यक्षपदी निवड : मनसेच्या संघटनात्मक बांधणीस नवे बळ

श्रीरामपूर | प्रतिनिधी दिपक कदम: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) श्रीरामपूर शहराध्यक्षपदी स्वप्निल सोनार यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली असून, ही नियुक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार तसेच मनसे नेते व अहिल्यानगर जिल्ह्याचे निरीक्षक बाळा नांदगावकर यांच्या सूचनेवरून मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे सदर निवड जाहीर केली आहे. ही नियुक्ती केवळ औपचारिक नसून, संघटनात्मकदृष्ट्या शहरातील मनसे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करणारी ठरणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. या अनुषंगाने श्रीरामपूर सारख्या राजकीयदृष्ट्या संवेदनशील आणि प्रबळ मतदारसंघ असलेल्या शहरात स्वप्निल सोनार यांच्यावर पक्षाच्या शहराध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली आहे.

शहराध्यक्षपदी निवड झाल्यानंतर स्वप्निल सोनार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले, “माझ्यावर टाकलेला विश्वास आणि जबाबदारी मी पूर्ण निष्ठेने पार पाडणार आहे. मनसेच्या भूमिकेला योग्य ठिकाणी न्याय मिळवून देण्यासाठी मी वचनबद्ध आहे. श्रीरामपूर शहरातील जनतेच्या प्रश्नांवर आम्ही आंदोलनात्मक आणि रचनात्मक अशा दोन्ही पद्धतीने लढा देणार आहोत.” त्यांनी पुढे सांगितले की, “सध्या शहरात अनेक नागरी समस्या निर्माण झाल्या आहेत. पाणीटंचाई, अपुरी आरोग्यसेवा, रस्त्यांची दुरवस्था, वाढती बेरोजगारी, तरुणांमध्ये वाढणारा नैराश्याचा कल याकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी कार्यकर्त्यांची बैठक घेऊन एकत्रितपणे कार्ययोजना आखण्यात येईल.” पुढे बोलताना ते म्हणाले मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे व जिल्हा अध्यक्ष बाबसाहेब शिंदे यांनी दिलेल्या जबाबदारी व्यवस्थितरीत्या पार पाडेल व संपूर्ण शहरात पक्ष संघटना नव्याने बांधून येत्या नगरपालिका निवडणुकीत मनसे पक्षाचे उमेदवार निवडून आणल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. असे मत नवनियुक्त शहराध्यक्ष स्वप्नील सोनार यांनी व्यक्त केले

याप्रसंगी गौरव डेंगळे, अनिल बागुल, नितीन क्षीरसागर, सुनिल क्षीरसागर, प्रविण जमदाडे, दिपक कदम, विनोद वाघमारे, निरज शहा, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

Previous articleमहापालिका शाळांमधील ओपन बार बंद करण्यासाठी गस्त वाढवा – .. आप ची बैठकीत मागणी कोल्हापूर. (
Next articleराहुरी / गुहा : नगर मनमाड राज्य महामार्गावर भीषण अपघात! कंटेनर जळून खाक
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here