आशाताई बच्छाव
अहिल्यानगर जिल्ह्यासाठी यलो अलर्ट
अहिल्यानगर प्रतिनिधी कारभारी गव्हाणे –जिल्ह्यात २६ ते २८ मे २०२५ दरम्यान वीजांच्या कडकडाटासह वादळी वारा व मुसळधार पाऊस होण्याचा शक्यता हवामान खात्यामार्फत वर्तवण्यात आली आहे. जिल्ह्यासाठी यलोअलर्टही जारी करण्यात आला असून नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.पुणे जिल्ह्यात भीमा नदीच्या मुक्त पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे भीमा नदीस दौंड पुल येथे १९ हजार ५५ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे.
भीमा नदीकाठावरील श्रीगोंदा व कर्जत तालुक्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून नदीकाठावरील गावांनी स्थानिक प्रशासनाद्वारे देण्यात आलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.मेघगर्जनेच्या वेळी, वीजा चमकत असताना किंवा वादळीवारे वाहत असतांना झाडाखाली किंवा झाडांजवळ उभे राहू नये. वीजेच्या सुवाहक भागांशी संपर्क टाळावा, असे आवाहन करण्यात आले आहे.






