Home गुन्हेगारी …वासोळच्या कोलतीनदी काठी “सट्टा माफीयाची भलतीच दांडगी दमदाटी,देवळा पोलिसांच्या नाकावर टिच्चून रोजच...

…वासोळच्या कोलतीनदी काठी “सट्टा माफीयाची भलतीच दांडगी दमदाटी,देवळा पोलिसांच्या नाकावर टिच्चून रोजच कमावतो जुगारातून रग्गड नोटांची पेटी!

301

…वासोळच्या कोलतीनदी काठी “सट्टा माफीयाची भलतीच दांडगी दमदाटी,देवळा पोलिसांच्या नाकावर टिच्चून रोजच कमावतो जुगारातून रग्गड नोटांची पेटी! ( राजेंद्र पाटील राऊत)
मालेगाव:- घरादाराचे वाटोळे करून देशोधडीला लावणारा जुगार म्हणजे रत्न खत्री संचलित सट्टा मटका सध्या देवळा तालुक्यातल्या वासोळ गावाच्या हद्दीत सुरू असल्याची खात्रीलायक माहिती प्राप्त झाली आहे. याबाबत सुत्रांकडून समजलेली माहिती अशी की,वासोळ ता.देवळा गावाच्या कोलती नदीकाठी चांदवडच्या “मुन्ना” नामक सट्टा माफियाने थैमान घातले आहे.त्यामुळे या भागातील गोरगरीब हातावर पोट भरणारा मजूर वर्ग मात्र या जुगाराच्या नादी लागून बरबाद होत असल्याचे एकंदरीत चित्र आहे. या प्रकाराची देवळा पोलिसांना साधी भनक सुध्दा लागू नये याबाबत जाणकार नागरिकांमधून सखेद आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Previous articleराजगुरुनगर येथे कचरा मुक्ती मोहीम
Next articleशेतकऱ्याला तात्काळ कर्जमुक्त करा विदर्भवादी शेतकरी संघटनेमार्फत जिल्हाधिकारी , प्रधानमंत्री ,मुख्यमंत्री, कृषी मंत्री यांना निवेदन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.