Home उतर महाराष्ट्र शिंदखेडा शहरात भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन

शिंदखेडा शहरात भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन

113

आशाताई बच्छाव

1001535387.jpg

शिंदखेडा शहरात भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन

(विरदेल शिंदखेडा -प्रतिनिधी राकेश बेहेरे पाटील)

पाकिस्तानविरोधात भारत सरकार तसेच सैन्याकडून करण्यात येणाऱ्या कारवाईचे समर्थन करण्यासाठी शिंदखेडा येथे महाराष्ट्र राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या मार्गदर्शनात व गटनेते अनिल वानखेडे यांच्या नेतृत्वात तिरंगा यात्रा काढण्यात आली. यात्रेत सहभागी झालेल्या शिंदखेडा शहरातील व परिसरातील नागरिकांसह, आजी माजी सैनिक व देशभक्त नागरिकांनी हम सेना के साथ है, हम देश के साथ है..!!!, हिंदुस्थान जिंदाबाद, भारत माता की जय….!!! अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. ठिकठिकाणी तिरंगा

रॅलीवर पुष्प वर्षाव करण्यात आला. गावात ठिकठिकाणी रांगोळ्या काढून तिरंगा यात्रेचे औक्षण करून स्वागत करण्यात आले. तिरंगा यात्रेचे विशेष आकर्षण म्हणजे सर्व आजी – माजी सैनिक त्यांच्या युनिफॉर्म वर उपस्थित होते. देशातील तणावग्रस्त परिस्थिती लक्षात घेत प्रशासकीय यंत्रणेकडून एकिकडे सावधगिरी बाळगण्यात येत असताना भारतीय सैन्याच्या समर्थनार्थ नागरिकांची एकजूट दिसू लागली आहे. प्रशासनाच्या प्रयत्नांना नागरिकांकडूनही साथ मिळू लागली आहे. शिंदखेडा शहरात काढण्यात आलेल्या तिरंगा यात्रेत विविध पक्षांचे तसेच सामाजिक, धार्मिक संघटनांचे कार्यकर्ते व नागरिक

मोठ्या संख्येने सामील झाले होते. भारताचा राष्ट्रध्वज तिरंगाउंचावत ही यात्रा काढण्यात आली. डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास माल्यार्पण करून प्रतीकात्मक भारत मातेचे सजीव देखावा गाडीवरून फिरवण्यात येऊन डी जेच्या तालावर देशभक्ती गीतांचा स्वागतात तिरंगा यात्रा संत सावता व्यायाम शाळेपासून, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले प्रवेशद्वार मार्गे ते गांधी चौक येथे आणून पहलगाम हल्ल्यातील निष्पाप नागरिक व शहीद जवानाना श्रद्धांजली अर्पण करून राष्ट्रगीताने समारोप करण्यात गेला. भारताचे स्वातंत्र्य अबाधित राहावे, भारताच्या प्रगतीचा आलेख सतत उंचावत रहावा, अशीच भूमिका भारतातील नागरिकांची असून

भारतात दहशतवादी कारवाया करणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारत सरकारने जी खंबीर भूमिका घेतली ती योग्य असल्याचे तसेच भारतीय लष्कर दाखवत असलेले शौर्य अभिमान गांधी चौकात सर्व सैनिकांचा सत्कार करण्यात आला. भाजपा ग्रामीण धुळे जिल्हाध्यक्ष बापू खलाणे, माजी जिल्हाध्यक्ष बबन चौधरी, जिल्हा सरचिटणीस अशोक संघवी, डी एस गिरासे, गटनेते अनिल वानखेडे, भाजपा तालुका ग्रामीणचे

अध्यक्ष मोतीलाल वाकडे, माजी उपनगराध्यक्ष भिला पाटील, युवराज माळी, प्रकाश देसले, उल्हास देशमुख, माजी नगरसेवक चेतन परमार, उदय देसले, अॅड विनोद पाटील, दीपक चौधरी, सुरज देसले, जिल्हा सरचिटणीस प्रविण माळी, शहराध्यक्ष संजयकुमार महाजन, खान्देश रक्षक ग्रुपचे अध्यक्ष सेवानिवृत्त सैनिक ज्ञानेश्वर गिरासे व पदाधिकारी, डॉ रविंद्र देसले, आदी सामील झाले होते.

Previous article.. आणि २९ वर्षांनी एकत्र आल्यावर झाले विद्यार्थी भावूक साकोली येथे केला शिक्षकांचा सत्कार ; स्नेह मिलन सोहळा संपन्न
Next articleराजगुरुनगर येथे कचरा मुक्ती मोहीम
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.