आशाताई बच्छाव
अहिल्यानगर प्रतिनिधी कारभारी गव्हाणे –शहीद जवान संदीप गायकर यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप जम्मू-काश्मीरमधील तिसवाड सेक्टर येथे सुरू असलेल्या सर्च ऑपरेशनदरम्यान दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत शहीद झालेले अकोले तालुक्यातील ब्राह्मणवाडा गावचे सुपुत्र संदीप पांडुरंग गायकर यांच्यावर त्यांच्या गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. हजारो नागरिकांनी साश्रुनयनांनी त्यांना अखेरचा निरोप दिला. जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.
संदीप पांडुरंग गायकर (वय ३२) लष्कराच्या १५ मराठा लाईट इन्फंट्रीमधील १७ राष्ट्रीय रायफल्समध्ये सैनिक पदावर कार्यरत होते. तिसवाड सेक्टर येथे दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत गुरुवारी (ता.२२) कर्तव्य बजावत असताना संदीप गायकर यांना वीरमरण आले होते.